पैशाचा पाऊस पाडणारा भामटा पोलीसांनी केला गजा आड
पैशाचा पाऊस पाडण्याचे व अघोरी विद्दे द्वारे आजार बरे करण्याचे अमिष दाखवून आर्थिक व लैंगीक शोषण करून फसवणूक करणारा भोंदू ला केले गजाआड पारनेर पोलीसांची कामगिरी पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत काळ्या जादूचा वापर करून लोकांचे आर्थिक व लैंगीक शोषण करून फसवणूक करणारे लोक फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड याच्या सहकार्यानी गोपनीय माहिती मिळाली की, पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील एका कुटुंबाला महादेवनाथ बाबा नावाचे एक भोंदू बाबा ने तो देवऋशी असल्याचे भासवून त्यांच्या घरातील अडचणींचे निवारण करण्यासाठी होम हवन करण्याचे अमिष दाखवून त्यांचेवर लैगीक अत्याचार करून त्यांचेकडून रोख रक्कम स्विकारून फसवणूक केली आहे. त्यावरून सदर कुटुंबाची माहिती घेऊन विचारपूस करत असताना सदर भयभीत झालेले कुटुंब पोलीसांकडे तक्रार देण्यासाठी घाबरत होते. परंतू त्यांना पोलीसांनी विश्वासात घेऊन त्यांना विचारपूस केल्यावर त्यांची सदर भोंदू बाबा याने तो देवऋशी असल्याचे भासवून...