पैशाचा पाऊस पाडणारा भामटा पोलीसांनी केला गजा आड

पैशाचा पाऊस पाडण्याचे व अघोरी विद्दे द्वारे आजार बरे करण्याचे अमिष दाखवून आर्थिक व लैंगीक शोषण करून फसवणूक करणारा भोंदू ला केले गजाआड 
पारनेर पोलीसांची कामगिरी 

पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत काळ्या जादूचा वापर करून लोकांचे आर्थिक व लैंगीक शोषण करून फसवणूक करणारे लोक फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून  पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  संभाजी गायकवाड याच्या सहकार्यानी 
गोपनीय माहिती मिळाली की, पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील एका कुटुंबाला  महादेवनाथ बाबा नावाचे एक भोंदू बाबा ने तो देवऋशी असल्याचे भासवून त्यांच्या घरातील अडचणींचे निवारण करण्यासाठी होम हवन करण्याचे अमिष दाखवून त्यांचेवर लैगीक अत्याचार करून त्यांचेकडून रोख रक्कम स्विकारून फसवणूक केली आहे. त्यावरून सदर कुटुंबाची माहिती घेऊन विचारपूस करत असताना सदर भयभीत झालेले कुटुंब पोलीसांकडे तक्रार देण्यासाठी घाबरत होते. परंतू त्यांना पोलीसांनी विश्वासात घेऊन त्यांना विचारपूस केल्यावर त्यांची सदर भोंदू बाबा याने तो देवऋशी असल्याचे भासवून त्यांच्या घरातील मरणा-या मेंढ्या मरू न देण्यासाठी, घरातील लोकांचे आजारपणाचे निवारण करण्यासाठी तसेच मुलीचे आजारपण दूर करण्यासाठी जादूटोणा करून होम हवन करण्याचे तसेच त्यांचे घरी पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून तसेच घरातील मुलीचे आजारपण दूर करण्याची पूजा करण्यासाठी त्याचे व तिचे लग्नात काढतात तसे गळ्यात हार व मंगळसूत्र घालतानाचे फोटो काढण्यास भाग पाडून त्याद्वारे त्यांना ब्लॅकमेल करून तसेच एअरगनचा धाक दाखवून पीडीतेवर लैगीक अत्याचार करून तिचे कुटुंबाकडून वरील जादूटोणा करण्यासाठी वेळोवेळी ५,५०,०००/- रूपये स्विकारून त्यांचे आर्थिक व लैंगीक शोषन करून फसवणूक केली आहे. त्याबाबत पीडीतेच्या फिर्यादीवरून भोंदू बाबा योगी महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे वय ४२ वर्षे रा- शिर्सुफळ, अटोळेवस्ती, मधलावाडा मराठी शाळेजवळ, बारामती जिल्हा-पुणे याचेविरूद्ध पोलीसांनी पारनेर पोलीस स्टेशनाल दि. २१/०६/२०२३ रोजी गु.र.नं. ५३६ / २०२३ भा.द.वि कलम ३७६ (२) (एन), ३५४(अ), ५०६, ४२० सह महाराष्ट्र नरबळी आणि ईतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करणे करिता व त्यांचे समुळ उच्चाटन करिता अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे असा गुन्हा केल्या असून त्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार