महाराष्ट्र शूटिंग बॉल संघाचे नेतृत्व प्रगतीकडे
महाराष्ट्र शूटिंग बॉल संघाच्या नेतृत्वाची धुरा प्रगतीकडे शेतकरी कुटुंबातील कन्येची राज्यस्तरावर चमक राहुरी । प्रतिनिधी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेतकरी कुटुंबातील कन्या प्रगती रामेश्वर गडाख हिने जिद्द, मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र शूटिंग बॉल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे येत महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची मिळालेली संधी ही देवळाली प्रवरा आणि राहुरी तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. प्रगतीने राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत आपल्या खेळातील कौशल्य, चपळता, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. मैदानावर परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणे, संघातील खेळाडूंमध्ये समन्वय निर्माण करणे आणि शेवटपर्यंत संघर्ष करण्याची तिची वृत्ती यामुळे तिने आपली वेगळी ओळ...