Posts

Showing posts with the label प्रक्रीया

शेणखत

Image
पशुपालकांनी शेणखत प्रक्रियेवर भर द्यावा पशुपालकांनी दुग्धव्यवसाय करतांना मुक्त गोठा पध्दतीचा अवलंब करुन शेणखत प्रक्रियेवर भर द्यावा. जसे दुग्धसंकलन केंद्रे आहेत त्या पध्दतीने गांडुळखत व व्हर्मीवॉश संकलन केंद्रे गावागावात सुरु व्हावीत असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे व नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) चे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले. राहुरी तालुक्यातील खडांबे येथे भारतीय दुग्धोत्पादक शेतकरी संघ (IDFA) अहमदनगर व माफसू यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन कुलगुरु डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी माफसूचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाणे, IDFA अहमदनगरचे श्री. रविंद्र नवले, कृषिभूषण श्री. सुरसिंग पवार उपस्थित होते.  यावेळी डॉ. अनिल भिकाणे मार्गदर्शन करतांना म्हणाले जनावरांचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरुवातीला जमिनीचे व्यवस्थापन करणे महत्वाचे ठरते. यामध्ये सकस जमिनीतून सकस चारा निर्मिती होते. आणि त्या सकस चार्यामुळे जनावरे सुदृढ राहुन दुग्धोत्पादन...