मुढवात सरकारचे मुढण खाली येवले भ्रष्ट तरी श्रेष्ठ
मुढवा प्रकरणात सरकारच मुढण खाली भ्रष्ट यवले तरी श्रेष्ठ आपल्या कडे भ्रष्टाचार इतका वाढला आहे की बस सर्वसामान्य माणूस हे सगळ्यातुन जातो अथवा मुळात खाबुगिरी करणार्याला पाठबळ असल्याने सगळ काही अलबेल असते एका सहीचे सही दाम घेतल्या शिवाय हे काम करत नाहीत पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका. अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं? त्याच्यामागे कोणाचं राजकीय छत्र आहे?. सर्वोच्च न्यायालयाने अशा पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा होऊ नये, राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमधे नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणे बंधनकारक केले आहे . ती यंत्रणा येवले प्रकरणात काय करत होती? की त्या यंत्रणेला डावलून येवलेंची बदली केली? केली असेल कोणी केली? नागरी सेवा मंडळाने शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यांवर कोण आणि कधी कारवाई करणार? ...