Posts

Showing posts with the label भाजपा व राष्ट्रवादीत

राहुरीची पोटनिवडणूक सत्ता संतुलनाची कसोटी

Image
राहुरीची पोटनिवडणूक  सहानुभूती सत्तासंतुलनाची कसोटी तरंग घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे   भाजपाचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेली राहुरी विधानसभा जागा ही आता केवळ पोटनिवडणूक राहिलेली नाही; ती स्थानिक राजकारणाच्या भवितव्याची, पक्षनिष्ठेची आणि मतदारांच्या प्राधान्यक्रमांची परीक्षा ठरत आहे. मार्च महिन्यात या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते   या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राहुरी, नगर तालुका आणि पार्थेडी परिसरातील काही गावे असा विस्तृत व सामाजिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण पट या मतदारसंघात येतो. ग्रामीण-शहरी समतोल, शेतकरी प्रश्न, पाणीटंचाई, रोजगार आणि स्थानिक पायाभूत सुविधा हे मुद्दे येथे निर्णायक ठरतात. त्यामुळे ही निवडणूक केवळ भावनिक लाटेवर जिंकता येणार नाही, तर ठोस कार्यक्रम आणि विश्वासार्ह नेतृत्वाची गरज भासणार आहे. दुरंगी की तिरंगी? राजकीय चर्चेत सध्या तीन प्रमुख नावे पुढे येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर मानले जाते. भाजपाकडून युवा नेतृत्व म्हणून अक्षय कर्डिले या...