महात्मा फुले कृषी विद्यापीठात डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर संभागृह
महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन; ५८ वर्षांनंतर नावाचा सन्मान घाडगे न्यूज ॥शिवाजी घाडगे ॥ महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुसज्ज सभागृह उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन बुधवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांचे नावाचे संभागृह या विद्यापीठाला लाभण्यासाठी तब्बल ५८ वर्षे प्रतीक्षा करावी लागली, ही बाब खेदजनकच म्हणावी लागेल. महात्मा फुले यांना आदर्श मानणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करण्यास एवढा विलंब का झाला, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. उशिरा का होईना, हा निर्णय झाला; मात्र तो अधिक आधी व्हायला हवा होता, हेही तितकेच सत्य आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानसभेच्या प्रचारसभेदरम्यान या परिसरात फळ प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. फळांपासून ज्यूससारखी उत्पादने तयार केल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकतो आणि स्थानिक अर्थचक्रालाही चालना मिळू शकते. त्य...