श्रीराबुरच्या गुन्हेगारीवर सुदर्शन अस्त्र
श्रीरामपूरच्या गुन्हेगारीवर सुदर्शन अस्त्र स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे पायात रुतलेला काटा अर्धवट काढून चालत नाही. तो अर्धवट राहिला, तर प्रत्येक पावलागणिक वेदना देत राहतो. जोपर्यंत तो पूर्णपणे बाहेर काढला जात नाही, तोपर्यंत आराम मिळत नाही. हाच न्याय समाजातील गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि कायद्याला आव्हान देणाऱ्या प्रवृत्तींबाबत लागू होतो. गुन्हेगारांवर कारवाई अर्धवट राहिली, भ्रष्टाचाराला मूक संमती मिळाली किंवा कायद्याची अंमलबजावणी निवडक पद्धतीने झाली, तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिन्यांत घडलेल्या गंभीर घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कठोर आणि स्पष्ट भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून काम करत असल्याचे वातावरण तयार झाले आहे. कोणत्याही पोलीस दलाची खरी ताकद केवळ गुन्ह...