Posts

Showing posts from April, 2026

मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी करारावर सहमती बैठक

Image
मुंबई येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत  संवर्धित  शेतीसाठी संशोधन करार संपन्न घाडगे न्यूज @प्रतिनिधी           हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख पीक पद्धतींमध्ये संवर्धित शेतीला  चालना देण्याच्या उद्देशाने भारतीय मृदा विज्ञान संस्था, भोपाळ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने प्रकल्पातील २१ जिल्ह्यांमध्ये पुढील तीन वर्षांकरिता संशोधन हाती घेण्यात येणार आहे. या विषयीचे सामंजस्य करार लोकभवन, मुंबई येथे करण्यात आले. याप्रसंगी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालिका श्रीमती मिनल करणवाल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू ...

राहुरीत कमळ की तुतारी?

Image
राहुरीत ‘कमळ’ की ‘तुतारी’? राजरंग।शिवाजी घाडगे   मतदारांचा कौल ठरवणार दिशा राहुरी विधानसभा पोटनिवडणूक अखेर पार पडली आणि उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. ही निवडणूक केवळ रिक्त जागा भरण्यापुरती मर्यादित नसून, स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांची चाचणी म्हणूनही पाहिली गेली. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात ही लढत रंगली असली, तरी प्रत्यक्षात ती दोन प्रमुख पक्षांतील थेट संघर्ष ठरली आहे. एकीकडे भाजपाचे अक्षय कर्डीले ज्यांनी वडिलांच्या वारशासोबत भावनिक मुद्दा पुढे करत विकासाची हमी दिली; तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंद मोकाटे ज्यांनी स्थानिक प्रश्न, शेतकरी अडचणी आणि बेरोजगारी यावर भर देत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले, ज्यातून राज्य आणि स्थानिक राजकारणातील दरीही स्पष्टपणे समोर आली. या निवडणुकीत सुमारे ५६.२० टक्के मतदान झाले, ही बाब विचार करायला लावणारी आहे. तीव्र उन्हाळा हा एक घटक असला तरी, मतदारांचा तुलनेने कमी प्रतिसाद ही लोकशाहीसाठी चि...

मिरजगाव येथे लाचखोर पोलीस पकडला

Image
ब्रेकिंग @घाडगे न्यूज मिरजगाव येथे लाच घेताना पोलीस कर्मचारी रंगेहात पकडला मिरजगाव  स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबला संरक्षण देण्यासाठी लाच स्वीकारताना एका पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपक सर्जेराव पवार असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो संबंधितांकडून ५,००० रुपयांची लाच घेताना जाळ्यात अडकला. शहरात पत्त्याचा क्लब सुरु ठेवण्या साठी ५००० हजार  रुपये हप्ता महिन्या काठी देवा लागेल अशी मागणी संबंधित तक्रारदार याच्या कडे केली त्याने नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाव घेऊन हकीगत विषद केली गुरुवारी ५००० हजार रुपये घेतांना पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली  ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संबंधित पत्त्याचा क्लब सुरू ठेवण्यासाठी संरक्षण देण्याच्या मोबदल्यात ही रक्कम स्वीकारली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला होता. ठरलेल्या योजनेनुसार पवार याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून, पोलिस खात्याच्या ...

राहुरी पोटनिवडणूक मतदान सुरुवात

Image
राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी मोठा बंदोबस्त घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात असून, गुरुवारी सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली होणाऱ्या मतदानात एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  मतदारांना सुरक्षित व निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, उप जिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव व नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्या देखरेखीखाली या निवडणूक प्रक्रियेचे  नियोजन करण्यात आले आहे. निवडणूकी साठी पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत. श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या अधिपत्याखाली सर्व ३७४ मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानादरम्यान पेट्रोलिंगही सुरू असून, कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी...

देवळाली प्रवरात मुलीनी सादर केले लाठी काठी प्रात्यक्षिके

Image
देवळाली प्रवरा येथे मुलींनी सादर केले लाठी-काठीचे प्रभावी प्रात्यक्षिक घाडगे न्यूज।प्रतिनिधी  देवळाली प्रवरा  शहरात बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू संमेलनादरम्यान मुलींनी लाठी-काठीचे नेत्रदीपक आणि धाडसी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दीडशे हुन अधिक मुली यात सहभागी झाल्या होत्या.  विशेष म्हणजे या प्रात्यक्षिकात सहभागी झालेल्या सर्व मुली या शहरातीलच असून, त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या पत्नी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. शहरात निघालेल्या मिरवणुकीदरम्यान नागरिकांना या मनमोहक प्रात्यक्षिकाचा अनुभव घेता आला. मुलींच्या शिस्तबद्ध हालचाली, समन्वय आणि धाडस यामुळे उपस्थितांकडून त्यांचे जोरदार कौतुक करण्यात आले. आजच्या काळात मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण अत्यंत गरजेचे बनले आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना अशा प्रकारच्या कौशल्यांचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. लाठी-काठीच्या सरावामुळे मुलींची एकाग्रता, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक धैर्य वाढण्यास मद...

राहुरीतुन ईडीबाई गायब ?

Image
 राहुरीतुन “ईडीबाई” गायब  राजरंग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर रंगलेले राजकारण उन्हाळ्यात तापलेले असताना, मतदानाच्या आदल्या दिवशी अचानक “ईडीबाई” गायब झाल्याची चर्चा समोर येणे ही केवळ साधी घटना नाही. ही चर्चा केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, सत्ताकारण, दबावतंत्र आणि जनमानसातील अस्वस्थता यांचे प्रतीक म्हणून पाहावी लागेल. गेल्या काही दिवसांत “ईडीबाई” या रूपकातून काही राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केल्याच्या आरोपांनी वातावरण ढवळून निघाले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा कारवायांचा वापर दबाव तंत्र म्हणून केला जातो, अशी जनतेत निर्माण झालेली भावना ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब आहे. कारण निवडणूक ही विचारांची, विकासाच्या मुद्द्यांची आणि जनतेच्या प्रश्नांची लढत असायला हवी; भीती आणि दबावाची नव्हे. अशा परिस्थितीत “ईडीबाई” राहुरीतून निघून गेल्याची चर्चा पसरताच काहींमध्ये दिलासा आणि समाधानाची भावना निर्माण झाली, हेही वास्तव आहे. यावरून जनतेच्या मनात दबावमुक्त वातावरणाची किती गरज आहे, हे स्पष्ट होते. मतदाराला निर्भयपणे मतदान करता येणे, ...

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक साठी 23 ला मतदान : प्रशासन सज्ज

Image
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्ण घाडगे न्यूज। प्रतिनिधी  राहुरी : राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना सुरक्षित व निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीतील एक महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण बदल म्हणजे मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व अन्य साहित्य घेण्यासाठी मुख्यालयात एकत्र येण्याची गरज नसून, त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरच थेट साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. वेळ व श्रमाची बचत व्हावी यासाठी सर्व मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी थेट त्या...

व्यवस्थेचा बो-या की तरुणांचा असंतोषाचा उद्रेक

Image
 व्यवस्थेचा बो-या की तरुणांच्या असंतोषाचा उद्रेक? घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत घडलेली लघुलेखन विद्यार्थिनींची बॅनरबाजी ही केवळ एक ‘घटना’ म्हणून पाहून चालणार नाही. ती दोन गंभीर बाबी अधोरेखित करते एक म्हणजे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी, आणि दुसरी म्हणजे तरुणांमध्ये वाढत चाललेला असंतोष. प्रथम, एवढ्या मोठ्या आणि उच्चस्तरीय सभेत आंदोलक सहजपणे प्रवेश करून बॅनर फडकवू शकतात, हे निश्चितच चिंताजनक आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असते. मात्र राहुरीतील घटनेने स्थानिक पोलीस प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ही त्रुटी केवळ दुर्लक्ष म्हणून सोडून देता येणार नाही; कारण अशा घटनांचे परिणाम गंभीर असू शकतात. दुसरीकडे, लघुलेखन  क्षेत्राशी संबंधित पदे संपुष्टात आणल्याच्या निर्णयामुळे विद्यार्थिनींमध्ये निर्माण झालेला रोषही तितकाच महत्त्वाचा आहे. या तरुणींची कृती पद्धत वादग्रस्त असू शकते, पण त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शिक्षण घेऊनही रोजगाराच्या...

अक्षय कर्डीले यांनी जिकले मने वडिलांच्या आठवणीने रडले मने

Image
राहुरीत अक्षय कर्डीले यांनी जिंकली जनतेची मने; वडिलांच्या आठवणींनी रडले सगळेच  राजरंग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी झालेली भाजपची प्रचार सभा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता भावनांचा महासागर ठरली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेला प्रचंड जनसमुदायाने प्रतिसाद दिला. मात्र या सभेचे खरे केंद्रबिंदू ठरले ते उमेदवार अक्षय कर्डीले यांचे हृदयस्पर्शी, प्रांजळ आणि अश्रूंनी दाटलेले भाषण. सभास्थळी वातावरण उत्साहाने भरलेले असतानाच अक्षय कर्डीले व्यासपीठावर उभे राहिले आणि काही क्षणांसाठी त्यांनी जनसमुदायाकडे पाहिले… तो क्षण जणू भावनांनी भारलेला होता. आपल्या भाषणाची सुरुवात करताच त्यांनी दिवंगत वडील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि क्षणार्धात संपूर्ण वातावरण गंभीर झाले. माझ्या मनात काय वेदना आहेत प्रतेक जण भेटायला येतो मात्र वडील भेटायला कधी येणार नाहीत ही वेदना सहन होत नाही. वडलांच्या आठवणीने,बहीण, पत्नी नातेवाईक संगळेच रडले मात्र उपस्थित जनसमुदाय सुध्दा रडला  “म...

कर्डीले वारशाची राहुरीत परीक्षा

Image
 कर्डीले वारशाची राहुरीत परीक्षा राजरंग।शिवाजी घाडगे  दिवंगत आमदार  शिवाजी कर्डीले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले हे देखिल लोकशाची परिक्षा देत असुन ही निवडणूक बिनविरोध होण्या साठी भाजपाने प्रयत्न केले मात्र त्याला यश आले नसले तरी भाजपाने ही निवडणूक हलक्यात घेतली नाही हे विशेष आज सायंकाळी सहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारसभा घेत आहेत  राहुरी विधानसभा पोटनिवडणूक ही केवळ एक जागा भरण्याची प्रक्रिया नसून, स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांची आणि नेतृत्वाच्या कसोटीची परीक्षा ठरत आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांनी आपल्या संघर्षमय आणि धडाडीच्या राजकारणातून निर्माण केलेला प्रभाव आजही या मतदारसंघात जाणवतो. मात्र, त्यांच्या पश्चात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे हे सोपे काम नाही. दिवंगत नेते शिवाजी कर्डीले हे सर्व सामान्य जनतेला आपला कामाचा माणूस वाटयचे आपल्याकडे आलेला व्यक्त कोणत्या पक्षाचा पार्टीचा पाहत नव्हते राजकारणात प्रस्थापित घराण्याला त्यांनी शह दिला तसेच आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याना ताकत व बळ दिले जनतेच्या सुखदुखात सहभागी असायचे ...

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहुरीत

Image
ब्रेकिंग @घाडगे न्यूज राहुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सोमवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सायंकाळी सुमारे ६.३० वाजता राहुरी येथे आयोजित प्रचार सभेत सहभागी होणार आहेत. या सभेत ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डीले यांच्या प्रचारासाठी मतदारांना संबोधित करणार आहेत. या दौऱ्याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, भाजपाकडून निवडणुकीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री यांच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आचार सहिता पालन करीत सभेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुरक्षा व नियोजनाची तयारी सुरू  आहे.

राहुरीत अक्षयतृत्तेयला प्रचार शिगेला आमदारकी कुणाच्या गळ्यात

Image
राहुरीत अक्षयतृत्तेयला प्रचार शिगेला.. आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात! राजरंग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा पोटनिवडणूक ही केवळ एका जागेची लढत राहिलेली नाही, तर ती स्थानिक राजकारणातील बदलत्या प्रवाहांची आणि मतदारांच्या परिपक्वतेची कसोटी ठरत आहे. अक्षयतृत्तेच्या मुहूर्तावर वेग घेतलेल्या प्रचारातून विविध पक्ष आणि उमेदवार आपापल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अक्षयतृत्तेला अक्षयचा राहुरी विधान संभा गड सर करण्या साठी प्रचार आघाडी प्रचारधारा हिंदुत्वाची  प्रेरणा कर्डीले साहेबाची नारा देत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डीले यांनी राहुरी विधानसंभा पोटनिवडणूक प्रचारात आघाडी घेतली असून राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांनी आपला प्रचार झझावत ठेवला असून वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आपण कामाचा माणूस असल्याचे सांगत प्रचार करत आहेत शेतीचे पाणी, बेरोजगारी, बंद पडलेला साखर कारखाना यावर भर आहे   तर अपक्ष रावसाहेब खेवरे यांनी कशा साठी तालुक्यांच्या विकासा साठी म्हणत मतदारांना हाक देत अभी नही तो कभी नही ची हाक दिली आहे   याशिवाय महेश हापसे यांनी किट...

राहुरीत तनपुरे फॅक्टर ची चाहुल

Image
राहुरीत ‘तनपुरे फॅक्टर' ची चाहूल राजरंग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा पोटनिवडणूक केवळ एका जागेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांची चाचणी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भूमिका केंद्रस्थानी आली असून, ते या निवडणुकीतील ‘किंगमेकर’ ठरू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच सध्या तनपुरे फॅक्टर ची चाहुल  महत्त्व प्राप्त झाले असून ते आपल्या कार्यकत्याशी विचार विनिमय करुन आपला निर्णय घेणार आहे ही निवडणूक भावनिक आहे कारण राहुरीचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांचे अकस्मात निधन झाल्याने ही निवडणूक लढणे सयुक्तिक नाही अथवा विरोधात निवडणूक जावुन तालुक्यातील विकास कामे होणार नाही  राजकारणात केवळ पक्षनिष्ठा नव्हे, तर व्यक्तिमत्त्व आणि स्थानिक प्रभावही तितकाच महत्त्वाचा ठरतो.  प्राजक्त तनपुरे यांचे व्यक्तिमत्त्व संयमी, सुसंवादी,सुशिक्षित,निरव्यसनी, चारित्र्य संपन्न आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सलोखा राखणारे आहे. त्यामुळेच ते कोणत्याही एका पक्षाच्या चौकटीत मर्यादित न राहता व्यापक स्वीकारार्हतेचे नेतृत्...

प्राचार्य डॉक्टर नवनाथ दळवी यांची नियुक्ती

Image
राहुरी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉ. नवनाथ दळवी यांची  नियुक्ती    घाडगे न्यूज।प्रतिनिधी                       राहुरी  आर व्ही धुमाळ महाविद्यालयाच्य   प्राचार्य म्हणून डॉ. नवनाथ दळवी यांना डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी स्वागत संमारंभ आयोजित कार्यक्रमात    अरुण  तनपुरे म्हणाले की डॉ. नवनाथ दळवी एक अभ्यासू दूरदृष्टी आणि संशोधनात्मक दृष्टीकोन असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या महाविद्यालयाला मिळालेले आहे त्याच्या ज्ञानाचा निश्चित फायदा या महाविद्यालय होईल   प्राचार्य डॉ.दळवी हे  के.जे.सोमय्या महाविद्यालय,कोपरगाव येथे रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून गेली 32 वर्ष कार्यरत होते.डॉ. दळवी यांच्या ज्ञानाचा व कल्पकतेचा फायदा आपल्या भागातील विद्यार्थ्यांना आणि आपल्या राहुरी तालुक्याला नक्कीच होईल तसेच ते आपल्या महाविद्यालया...

भाजपाला हवा प्राजक्त यांचा सहवास

Image
 कमळाला हवा ‘प्राजक्त’यांचा सहवास राजरंग॥ शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, मतदारसंघात एकूण 3 लाख 33 हजार 545 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार केला आहे. मात्र, माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते प्राजक्त तनपुरे यांना निवडणूक लढवण्यापासून परावृत्त करण्यात भाजपाला यश आले, अशी चर्चा असली तरी त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अनिश्चितता कायम आहे. सध्या ते मतदारसंघातही सक्रिय दिसत नाहीत. या निवडणुकीत भाजपाने दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देत निवडणुकीत रंगत आणली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून नगरसेवक संतोष चोळके, तर शिवसेनेचे...

राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीत अपंग व वृध्दा साठी घरीच मतदान

Image
राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदान घाडगे न्यूज।प्रतिनिधी  ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा  राहुरी विधानसभा पोटनिवडणूकी साठी  मतदारसंघातील ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या टपाली मतदानासाठी मान्य मतदारांसाठी १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी गृह मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले असून, गरज भासल्यास १९ एप्रिल हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. ही प्रक्रिया सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप यादव यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेत सर्वांचा सहभाग वाढवण्यासाठी व शारीरिक अडचणींमुळे मतदान केंद्रावर येणे शक्य नसलेल्या मतदारांना सुलभता निर्माण करून देण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या मतदारांनी १२-डी अर्ज भरून या सुविधेची मागणी केली आहे, त्यांनाच गृह मतदानाची सुविधा लागू राहणार आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त प्रत्येक पथकामध्ये दोन मतदान अधिकारी, एक शिपाई, एक सूक्ष्म निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी व एक व्हिडिओग्राफर यांचा समावेश असणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व ...

राहुरीत फुलेले कमळ पवार याच्या पाॅवरने...?

Image
राहुरीत फुलले कमळ; पवारांच्या ‘पॉवर’ने ......का? राजरंग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून “राहुरीत पुन्हा कमळ फुलेल की राष्ट्रवादीची ‘पॉवर’ ते खुडेल?” अशी जोरदार चर्चा रंगली आहे. ही निवडणूक आता केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची लढत ठरताना दिसत आहे. दोन्ही दिग्गज नेते प्रचारासाठी राहुरीत येणार असल्याने निवडणुकीची रंगत अधिक वाढली आहे. राहुरीच्या राजकीय इतिहासात 1998 मधील पोटनिवडणूक अत्यंत नाट्यमय ठरली होती. त्या वेळी पहाटेच्या फेरमतमोजणीत कमळ फुलले आणि चंद्रशेखर कदम हे अवघ्या 23 मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यांनी दिवंगत नेते रामदास धुमाळ यांचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत एकूण 1 लाख 63 हजार 440 मतदारांपैकी 87 हजार 829 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये चंद्रशेखर कदम यांना 34,523, रामदास धुमाळ यांना 34,500 तर पंढरीनाथ पवार यांना 15,052 मते मिळाली होती. या निवडणु...

तोफखाना पोलीस हवालदार गोसावी विरोधात लाच मागणी गुन्हा दाखल

Image
तोफखाना पोलीस हवालदाराविरोधात लाचखोरीचा गुन्हा दाखल घाडगे न्यूज। प्रतिनिधी नगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार अनिल आदिनाथ गोसावी याच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराकडून कौटुंबिक हिंसाचाराच्या चौकशीत मदत करण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. नंतर तडजोडीनंतर ३0 हजार रुपये घेऊन मदत करण्याचे मान्य करण्यात आले होते. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उप अधीक्षक  अजित त्रिपुटे यांच्या फिर्यादीवरून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकीत कायदा व सुव्यस्था आबादीत ठेवा

Image
राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकीत  कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया      घाडगे न्यूज।प्रतिनिधी   राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच संपूर्ण मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंगळवारी  दिल्या. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह संबंधित पोलीस व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त सर्व अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय राखत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि आपली जबाबदारी प्रभावीपणे...

चहाची किटली मागे नाही हटली

Image
चहाची किटली मागे  नाही हटली ‘सामान्य माणसाचा आवाज’ बनण्याचा निर्धार – महेश हापसे घाडगे न्यूज| प्रतिनिधी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार महेश हापसे यांनी आपल्या साध्या, पण ठाम भूमिकेमुळे मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. “चहा विकून नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकतात, तर ‘किटली’ हे निवडणूक चिन्ह घेऊन मी आमदार का होऊ शकत नाही?” असा सवाल उपस्थित करत हापसे यांनी आपला प्रचार अधिक आक्रमक केला आहे. हापसे म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच आपल्याला मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाला आहे. त्या अधिकाराचा वापर करून मी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवत आहे. माझा अनुक्रमांक सात असून ‘किटली’ हे माझे निवडणूक चिन्ह आहे. सामान्य मतदारांनी मला साथ द्यावी.” सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, “सामान्य माणसाचा अवमान आणि अपमान झाला आहे. आता त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. सत्तेचा वापर जनतेसाठी न करता स्वतःच्या फायद्यासाठी करण्यात आला, ही वस्तुस्थिती आहे. मी मात्र जनतेसाठी काम करण्य...

आजी माजी खासदार प्रचारात सक्रिय राजकारणात तापले

Image
आजी-माजी खासदार प्रचारात सक्रिय; राहुरीत राजकीय वातावरण तापले राजरंग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून, आजी व माजी खासदारांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्याने निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे. विद्यमान खासदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. तर माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डीले यांच्या प्रचारार्थ जोरदार मोहीम राबवत आहेत. डॉ. सुजय विखे-पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणुकीत कोणतीही गाफीलगिरी परवडणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधावा आणि अक्षय कर्डीले यांना अधिकाधिक मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले. तसेच तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचारसभांचे आयोजन करून मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्या विजयाबाबत पक्षाच्या नेत्यांनी आशाव...

भारय रत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

Image
राहुरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; युवक व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग घाडगे न्यूज।प्रतिनिधी    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहुरी शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून या मिरवणुकीला युवक, महिला तसेच भीमसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आहे. संपूर्ण परिसर ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला असून वातावरण अत्यंत उत्साही व चैतन्यमय झाले आहे. या मिरवणुकीत विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि युवक मंडळांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, तसेच आकर्षक देखावे यामुळे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरत आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभागही विशेष लक्षवेधी ठरत आहे. रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आरपीआय)चे तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आंबेडकर अनुयायांच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत असून नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आहे. दरम्यान, मिरवणुकीच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्त आवश्यक तेवढा नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात ...

सायकलवरून प्रचार करत आहेत अपक्ष उमेदवार महेश हापसे

Image
सायकलवरून साधा पण प्रभावी प्रचार; अपक्ष उमेदवार महेश हापसे यांची वेगळी हवा  राजरंग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध उमेदवारांचा प्रचार रंगात आला असताना, अपक्ष उमेदवार महेश हापसे यांनी आपल्या साध्या आणि वेगळ्या प्रचार पद्धतीमुळे मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. निवडणूक म्हटली की मोठा झगमगाट, महागड्या गाड्या आणि भव्य रॅली असे चित्र सामान्यतः पाहायला मिळते. मात्र हापसे यांनी या पारंपरिक चौकटीला छेद देत सायकलवरून प्रचार करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सायकलवरून गावोगावी फिरत ते थेट मतदारांशी संवाद साधत आहेत. या माध्यमातून ते आपली भूमिका, विचार आणि स्थानिक प्रश्नांविषयीची बांधिलकी सहज आणि प्रभावीपणे मांडत आहेत. त्यांच्या या साधेपणातच प्रामाणिकपणा आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची खरी इच्छा दिसून येते, अशी भावना अनेक मतदार व्यक्त करत आहेत. निवडणुकीत विजय-पराजय हा प्रक्रियेचा भाग असतो. कोणीतरी निवडून येणार, तर काही उमेदवारांना पराभव पत्करावा लागणार, हे वास्तव असले तरी महेश हापसे यांच्यासारखे जिद्दी उमेदवार लोकशाही प्रक्रियेला बळकटी देतात. त्यांच्या...

राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकी साठी प्रशासन सज्ज

Image
राहुरी  प्रशासन सज्ज; प्रचाराला वेग घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी विधानसभा पोटनिवडणूक येत्या २३ एप्रिल रोजी पार पडणार असून, निवडणुकीसाठीची सर्व प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पूर्ण झाली आहे.3 लाख 33हजार 545 मतदार आपला मताचा हक्क बजावणार आहेत.   शासन स्तरावर आवश्यक नियोजन करण्यात आले असून निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. तसेच प्रत्यक्ष मतदानासाठी लागणाऱ्या मतपत्रिका आणि पोस्टल मतपत्रिकांची छपाईही पूर्ण करण्यात आली आहे. ही निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत वातावरणात पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. त्यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.   राहुरी पनिवडणूक साठी निवडणूक  निर्णय अधिकारी म्हणून अनुपसिंह यादव हे असुन निवडणूकी साठी  एकूण बुध, मतदान केंद्र -374 आहेत एकूण मतदान-333545 परुष मतदार...

जेष्ठ गाईका आशा भोसले मागील वर्षी घेतले साई दर्शन

Image
गाईका आशा भोसले मागील वर्षी आल्या होत्या साई मंदिरात  घाडगे न्यूज। शिर्डी  ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची शिर्डीच्या साईबाबांवर अपार श्रद्धा होती. गेल्या वर्षी, २९ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी शिर्डी येथे येऊन साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले होते. त्या वेळी त्यांनी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशीही मनमोकळा संवाद साधला होता. दुर्दैवाने, त्यांचे हे शिर्डीचे दर्शन शेवटचे ठरले. आशा भोसले यांनी आपल्या समृद्ध आणि बहुआयामी गायन कारकिर्दीत साईबाबांवरील अनेक भक्तिगीते आणि भजने सादर केली आहेत. त्यांच्या सुरेल आवाजातील ही भक्तिगीते साईभक्तांसाठी आजही अनमोल ठेवा मानली जातात. त्यांच्या गायनातून प्रकट होणारी भक्तीभावना भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करते. “साईभक्तांच्या हृदयात त्या सदैव जिवंत राहतील. त्यांच्या स्मृती आणि त्यांच्या आवाजातील भक्तिगीते भाविकांना कायम प्रेरणा देत राहतील,” अशा भावपूर्ण शब्दांत शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

राहुरी पोटनिवडणूकीत श्रीमंतीत भाजपाचे उमेदवार आघाडीवर

Image
श्रीमंतीत भाजपाचे उमेदवार आघाडीवर; पत्नी प्रियंका यांच्या हातात 6 लाखांची रोख रक्कम घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सर्व उमेदवारांनी आपले संपत्ती विवरणपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी रंगत असताना उमेदवारांनी सादर केलेल्या संपत्ती विवरणपत्रामुळे एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. सात उमेदवारांच्या या लढतीत कोणाच्या प्रचाराची, विचारांची किंवा विकासाच्या आराखड्याची चर्चा कमी आणि त्यांच्या संपत्तीचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे, ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक म्हणावी लागेल. भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डीले हे श्रीमंतीत आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. हॉटेल, पेट्रोल पंप, वाईन शॉप, शेती व दुग्धव्यवसाय अशा विविध स्रोतांमधून त्यांचे उत्पन्न येते. त्यांच्या कुटुंबाकडे असलेली मोठी संपत्ती आणि रोख रक्कम यामुळे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार असल्याचे दिसते त्यांच्या कुटुंबाच्या नावावर हॉटेल, पेट्रोल पंप तसेच पत्नीच्या नावावर वाईन शॉप आहे....

राहुरी पोटनिवडणूकीत लढविणाऱ्या पेक्षा न लढणाऱ्यांची’च अधिक चर्चा

Image
राहुरीत लढणाऱ्यांपेक्षा ‘न लढणाऱ्यांची’च चर्चा अधिक राजरंग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसंभा पोटनिवडणुकी साठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून राहुरी, नगर तालुका आणि पार्थेडी तालुक्यातील मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत एकूण सात उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज  ठेवले आहेत. यात भाजपाचे अक्षय कर्डीले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके, शिवसेनेचे बंडखोर अपक्ष रावसाहेब खेवरे तसेच अपक्ष उमेदवार म्हणून अर्थव म्हसे, सूर्यभान लांबे आणि महेश हापसे यांचा समावेश आहे. हे सर्व उमेदवार राहुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मतदान यंत्राद्वारे मतदान झाल्यानंतर मतमोजणी होऊन राहुरीचा नवा आमदार कोण होणार, हे स्पष्ट होईल. मात्र या निवडणुकीत एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात लढणाऱ्या उमेदवारांपेक्षा ‘कोण निवडणूक लढले नाही’ याचीच चर्चा अधिक रंगत आहे. काही इच्छुकांनी उमेदवारी अर्ज न भरल्याने किंवा माघार घेतल्याने त्त्यांचे अभिनंदन केले जात असल्याचेही चित्र दि...

राहुरी पोटनिवडणूक निमित्त 23 एप्रिला सुट्टी

Image
राहुरी पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर घाडगे न्यूज।प्रतिनिधी   राहुरी विधानसभा मतदारसंघातील व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी, गुरुवारी २३ एप्रिल २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ही सुट्टी मतदारसंघाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त मतदारसंघाबाहेर असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. त्यामुळे सर्व पात्र मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावणे सुलभ होणार आहे. सदर अधिसूचना राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालयांसह निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच इतर आस्थापनांनाही लागू होणार आहे.

राहुरीची सप्तरंगी लढत लोकशाही सक्षम असल्याचे चिन्ह

Image
राहुरीची ‘सप्तरंगी’ लढत  लोकशाही सक्षम असल्याचे चिन्ह  राजरंग ॥शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीने आता स्पष्टपणे बहुरंगी वळण घेतले आहे. सुरुवातीला बिनविरोध निवडणुकीची शक्यता वर्तवली जात असताना, शेवटच्या टप्प्यात ती पूर्णपणे फोल ठरली आणि अखेर ‘सप्तरंगी’ लढत उभी राहिली. हे चित्र केवळ राजकीय घडामोडींचे नसून लोकशाहीच्या जिवंतपणाचे द्योतक आहे. बिनविरोध निवडणूक ही काही वेळा सहमतीचे प्रतीक मानली जाते; परंतु अनेकदा ती स्पर्धेचा अभाव आणि मतदारांच्या निवडीवर मर्यादा आणणारी ठरते. राहुरीत मात्र अपक्षांसह विविध पक्षांच्या उमेदवारांनी मैदानात उतरून या प्रवृत्तीला छेद दिला. त्यामुळे मतदारांना पर्याय उपलब्ध झाले आणि “निवड” हा लोकशाहीचा मूलभूत हक्क अबाधित राहिला. या निवडणुकीत केवळ पक्षीय ताकद नव्हे, तर स्थानिक अस्मिता, घराणेशाहीविरोध, सहानुभूती आणि विकासाचे प्रश्न हेही केंद्रस्थानी आले आहेत. विशेष म्हणजे, पारंपरिक व प्रस्थापित राजकीय कुटुंबांची अनुपस्थिती ही या लढतीची वेगळीच बाजू आहे. त्यामुळे निवडणूक अधिक खुली झाली असून मतदारांवर अंतिम निर्णयाची मोठी जबाबदारी येऊन ठेप...

राहुरी विधानसंभा पोटनिवडणूक निष्पक्ष व सुरळीत पार पाडा -डाॅ पंकज आशिया

Image
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया घाडगे न्यूज | प्रतिनिधी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शुक्रवारी दिल्या. राहुरी येथे आयोजित निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी किरण सावंत-पाटील यांच्यासह विविध विभागांचे समन्वय अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. आशिया म्हणाले की, निवडणूक कामकाजात कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. मतदानाच्या दिवशी मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, अखंडित वीजपुरवठा, पुरेशी सावली तसेच दिव्यांगांसाठी रॅम्प यांसारख्या आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यावेळी त्यांनी...

तांभेरे बिबट्या मृत

Image
तांभेरे येथे बिबट्या मृत अवस्थेत आढळला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण घाडगे न्यूज।प्रतिनिधी  तांभेरे गावातील साहेबराव मुसमाडे यांच्या घासाच्या शेतात शुक्रवारी सकाळी एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत बिबट्याच्या डोळ्याजवळ जखमा आढळल्याने त्याची इतर एखाद्या वन्य प्राण्याशी झुंज झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित शेत परिसरात घास, मका, डाळींब व ऊस यांसारखी गारवा देणारी पिके मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे पाणी व आच्छादन उपलब्ध होते. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्यांसह इतर वन्य प्राण्यांची वर्दळ वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. गेल्या काही काळात बिबट्या व इतर वन्य प्राण्यांच्या हालचालींबाबत ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, साहेबराव मुसमाडे, नंदकुमार दिघे, बंडू मुसमाडे व अशोक पवार यांनी या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून, त्यानंतर नियमानुसार त्याव...

सप्तरंग लढतीत राहुरीची कसोटी

Image
सप्तरंगी लढतीत राहुरीची खरी कसोटी रिपोर्ट।घाडगे न्यूज  राहुरी विधानसभा पोटनिवडणूक सुरुवातीला बिनविरोध होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र राजकीय घडामोडींनी वेग घेतल्याने ही निवडणूक आता थेट ‘सप्तरंगी’ लढतीत परिवर्तित झाली आहे. सात उमेदवार रिंगणात उतरल्याने मतदारांसमोर पर्याय वाढले असले तरी या निवडणुकीची खरी कसोटी आता मतदारांच्या निर्णयक्षमतेची ठरणार आहे. बिनविरोध निवडणूक ही लोकशाहीच्या दृष्टीने आदर्श वाटू शकते, परंतु स्पर्धा नसलेली निवडणूक लोकमताचा खरा कौल दाखवत नाही. राहुरीतही तसेच चित्र दिसत होते. प्रमुख नेत्यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले, समीकरणे जुळवली गेली; पण अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी उमेदवार देताच ही ‘निवडणूक’ पुन्हा खऱ्या अर्थाने जिवंत झाली. भाजपाने दिवंगत आमदारांच्या वारशावर अक्षय कर्डीले यांना संधी देत भावनिक आणि संघटनात्मक ताकद एकवटण्याचा प्रयत्न केला आहे. सहानुभूतीची लाट आणि पक्षयंत्रणा या दोन गोष्टी त्यांच्या बाजूने असू शकतात. मात्र निवडणूक केवळ भावनांवर जिंकली जात नाही, हेही तितकेच खरे आहे. दुसरीकडे, गोविंद मोकाटे यांच्या...

राहुरी विधानसंभा पोटनिवडणूक सात उमेदवार निवडणूक लढवणार

Image
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध नाही; सात उमेदवार नशीब आज मावणार  घाडगे न्यूज।प्रतिनिधी   राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. अखेरीस या पोटनिवडणुकीत सात उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) समर्थक अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे तसेच अपक्ष उमेदवार म्हणून सूर्यभान लांबे, महेश हापसे आणि अथर्व म्हसे हे उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, काही उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी शेवटपर्यंत राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू होते. विशेषतः रावसाहेब खेवरे यांच्या उमेदवारी माघारीसाठी जोरदार हालचाली झाल्याची चर्चा होती, मात्र त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके हे पूर्वी देवळाली प्रवरा येथील शिवसेनेचे शहरप्रमुख होते. ...

आपत्कालीन स्थितीत हॅम चे महत्त्व

Image
आपत्कालीन परिस्थितीत हॅम रेडिओचे महत्त्व अधोरेखित अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, अशा वेळी प्रभावी संपर्क व्यवस्था किती महत्त्वाची ठरते याबाबत जनजागृती करण्यासाठी शिर्डी अमॅच्युअर रेडिओ क्लबच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील निवडक विद्यार्थ्यांना नगर येथील चांदबीबी महाल परिसरात हॅम रेडिओबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात हॅम रेडिओची कार्यपद्धती, आपत्कालीन काळात त्याची उपयुक्तता, तसेच पारंपरिक संप्रेषण व्यवस्था खंडित झाल्यास हॅम रेडिओ कसा प्रभावी पर्याय ठरतो, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती किंवा अन्य संकटांच्या वेळी हॅम रेडिओद्वारे जलद आणि विश्वासार्ह संवाद साधता येतो, हे विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले. यावेळी शिर्डी अमॅच्युअर रेडिओ क्लबचे अध्यक्ष परशुराम कुटे, सदस्य तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, तसेच राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत हॅम रेडिओ क्षे...