Posts

Showing posts with the label खाकीवरचा विश्वास का उडतोय

खाकी- खांदी -गुंडाची अभ्रद्र युती जनतेची सुरक्षा वाऱ्यावर

Image
खाकी–खादी–गुंडांची अभद्र युती : जनतेची सुरक्षा वाऱ्यावर स्पेशल रिपोर्ट।शिवाजी घाडगे  श्रीरामपूरातील तरुण उद्योजक आकाश दुबया यांच्या निर्घृण हत्येनंतर शहरात उसळलेला संताप हा केवळ एका गुन्ह्याविरोधातील निषेध नाही; तो संपूर्ण कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेवर नागरिकांनी व्यक्त केलेला अविश्वास आहे. सलग बंद, सर्वपक्षीय मोर्चे, व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सामान्य नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद यामधून एकच संदेश स्पष्टपणे समोर आला गुन्हेगारांची वाढती दहशत आणि त्यांना मिळत असल्याची भावना असलेले राजकीय व प्रशासकीय संरक्षण आता असह्य झाले आहे. कायद्याचा धाक कमी झाला की गुन्हेगारीचे साम्राज्य वाढते. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर आरोपी पकडणे पुरेसे नसते; गुन्हेगारीची मुळे शोधून ती उपटून टाकणे अधिक महत्त्वाचे असते. श्रीरामपूरात अंमली पदार्थांचे जाळे उघडकीस आले, काही कारवाया झाल्या; परंतु त्यामागील सूत्रधार, आर्थिक साखळी आणि राजकीय संरक्षण यांचा शोध घेणे तेवढेच आवश्यक आहे. अन्यथा आज दुसऱ्याच्या घरात पोहोचलेली गुन्हेगारी उद्या प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावेल. आजची सर्वात भीषण बाब म्हणजे तरुण ...