राहुरीत कमळ की तुतारी?
राहुरीत ‘कमळ’ की ‘तुतारी’? राजरंग।शिवाजी घाडगे मतदारांचा कौल ठरवणार दिशा राहुरी विधानसभा पोटनिवडणूक अखेर पार पडली आणि उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. ही निवडणूक केवळ रिक्त जागा भरण्यापुरती मर्यादित नसून, स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांची चाचणी म्हणूनही पाहिली गेली. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात ही लढत रंगली असली, तरी प्रत्यक्षात ती दोन प्रमुख पक्षांतील थेट संघर्ष ठरली आहे. एकीकडे भाजपाचे अक्षय कर्डीले ज्यांनी वडिलांच्या वारशासोबत भावनिक मुद्दा पुढे करत विकासाची हमी दिली; तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंद मोकाटे ज्यांनी स्थानिक प्रश्न, शेतकरी अडचणी आणि बेरोजगारी यावर भर देत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले, ज्यातून राज्य आणि स्थानिक राजकारणातील दरीही स्पष्टपणे समोर आली. या निवडणुकीत सुमारे ५६.२० टक्के मतदान झाले, ही बाब विचार करायला लावणारी आहे. तीव्र उन्हाळा हा एक घटक असला तरी, मतदारांचा तुलनेने कमी प्रतिसाद ही लोकशाहीसाठी चि...