गावरान गाय नैसर्गिक शेतीचा पाया कुलगुरु डॉ विलास खर्चे
गावरान नैसर्गिक शेतीचा पाया; देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार - कुलगुरू डॉ. विलास खर्चे घाडगे न्यूज |प्रतिनिधी कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट दिली. यावेळेस त्यांनी संशोधन केंद्राने जोपासलेल्या सहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी या देशी दुधाळ गोवंशांची व खिलार, लाल कंधारी, देवणी, गवळाऊ, कोकण कपिला, डांगी आणि पुंगनूर या देशी गोवंशांची पाहणी केली. संशोधन केंद्रातील सर्व गोठे, दूध उत्पादन व प्रक्रिया युनिट, बायोगॅस सयंत्र, सौर ऊर्जा युनिट, शेण व गोमूत्र प्रक्रिया युनिट, पशुधनाकरता आवश्यक असणाऱ्या आयुर्वेदिक औषधींची धन्वंतरी बाग, गो परीक्रमा, वातावरण नियंत्रित गोठा तसेच संशोधन केंद्राने विकसित केलेले एकात्मिक गोपालन मॉडेल या सर्व बाबींची त्यांनी पाहणी केली. केंद्राद्वारे राबविल्या जात असलेल्या विविध संशोधन कार्यक्रमांची व प्रशिक्षण व विस्तार कार्यक्रमांची त्यांनी माहिती घेतली. याप्रसंगी त्यांनी देशी गाय संशोधन ...