Posts

Showing posts with the label बियाणे विक्री सुरु

चला कांदे बियाणे खरेदीला विद्यापीठात

Image
कांद्याचे बियाणे खरेदी साठी चला विद्यापीठात  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कृषि विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या कांदा बियाण्याची विक्री सुरू करण्यात आली. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव अरुण आनंदकर, नियंत्रक  सदाशिव पाटील, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विठ्ठल शिर्के, निम्नस्तर कृषि शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता  डॉ. साताप्पा खरबडे  उपस्थित होते. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते मुक्काम पोस्ट दुगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथील हिरामण मंडलिक व राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील श्रीमती मंदाकिनी औटी यांना मान्यवरांच्या हस्ते कांदा बियाणे देऊन विक्री सुरू करण्यात आली. यावेळी बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकर्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बियाणे विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे. यावेळी पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मास...