Posts

Showing posts with the label 5 मार्च रोजी

कोल्हापुर कृषी महाविद्यालय यांत्रिक दिवसाचे आयोजन

Image
कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथे कृषि यांत्रिकीकरण दिवसाचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहु महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापुर येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, मफुकृवि, राहुरी, महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कोल्हापुर तसेच कृषि अवजारे उत्पादन संघटना (AIMA, महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापुर येथे मंगळवार दिनांक 5 मार्च, 2024 रोजी कृषि यांत्रिकीकरण दिवस साजरा करण्यात येणार आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांनी शेतीत जास्तीत जास्त सुधारित यंत्रे व कृषि अवजारांचा वापर करावा हा उददेश ठेवुन आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेनुसार भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत येणार्या व कृषि विद्यापीठात असणार्या अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पामार्फत देशभरात एकाच...