माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह नऊ विधान परिषद सदस्य होणार निवृत्त
विधान परिषद निवृत्तीचा टप्पा आणि नव्या राजकीय समीकरणांची चाहूल राजरंग। घाडगे न्यूज राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अंतिम टप्प्यात असताना, आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह नऊ विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत असून, ते लवकरच निवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्याचे अधिवेशन त्यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विधान परिषद ही केवळ पुनरावलोकन करणारी सभागृह नसून, अनुभवी आणि धोरणात्मक नेतृत्वाचा आवाज असलेले व्यासपीठ मानले जाते. अशा वेळी विविध पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे नऊ सदस्य एकाच वेळी निवृत्त होणे, ही केवळ नियमित प्रक्रिया नसून, राजकीय बदलांची नांदी ठरू शकते. विशेषतः उध्दव ठाकरे यांच्यासारख्या प्रमुख नेत्याची निवृत्ती ही केवळ वैयक्तिक राजकीय टप्पा नसून, राज्याच्या सत्तासमीकरणांवरही परिणाम करणारी घटना आहे. या नऊ जागांसाठी होणारी आगामी निवडणूक ही सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील ताकदीची खरी कसोटी ठरणार आहे. विधानसभेत...