नोकरी नाही लागली पण ती....
नोकरी लागली नाही पण ती...... अभिषेक भोवले अत्याचार प्रकरण रविवार विशेष @शिवाजी घाडगे अलिकडे सर्वत्र बेरोजगारी वाढली असून जो तो आपआपल्या परीने काही तरी काम धंदा शोधतो असे असले तरी नोकरी मिळणे साधी गोष्ट राहीली नाही आणि लागली तरी ती टिकेल याचा देखील भरोसा नाही नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर याच्यावर एका तरुणीने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली असून ते फरार असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. नोकरीचे आमिष, सत्तेचा माज आणि समाजमाध्यमांचा सापळा नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्याने केवळ एका व्यक्तीवर आरोप ठेवलेले नाहीत त्याने संपूर्ण राजकीय संस्कृतीच उघडी पाडली आहे. आरोपांची सत्यता न्यायालय ठरवेल; पण समाजाला छळणारा प्रश्न अधिक भेदक आहे नोकरीच्या आमिषावर सत्तेचा वापर करून किती दूरपर्यंत जाण्याची हिंमत काही जण करतात? आज शाळा भरती असो, जिल्हा परिषद असो किंवा अन्य नोकरभरती सर्व प्रक्रिया ऑनलाइन, टीईटी पात्रता, पोर्टल्स, पारदर्शकतेची भाषा… पण वास्तवात “ओळख” आणि “संपर्क” यांची सावली अजून...