Posts

Showing posts with the label तीन नावे चर्चेत

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक साठी भाजपाकडून अक्षय कर्डिले

Image
राहुरी पोटनिवडणूक : भाजपकडून अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारीची शक्यता ब्रेकिंग | घाडगे न्यूज राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याची शक्यता प्रबळ असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. पक्षांतर्गत चर्चेनंतर त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत मिळत असून, येत्या दोन दिवसांत पक्ष कार्यालयाकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अक्षय कर्डिले यांच्यासह आणखी दोन इच्छुकांची अशी एकूण तीन नावे पक्षश्रेष्ठींकडे अंतिम निर्णयासाठी दिल्लीला पाठविल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि सहानुभूतीची लाट लक्षात घेऊन अक्षय कर्डिले यांच्या नावाला प्राधान्य दिले जात असल्याचे समजते. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या आकस्मिक निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती असलेली सहानुभूती आणि स्थानिक राजकारणातील प्रभाव लक...