Posts

Showing posts with the label सकारात्मक जीवन

अरोपीचे समुपदेशन गुन्हेगारी पासून प्ररावृत्त

Image
आरोपी परेडमध्ये १२१ आरोपींचे समुपदेशन; गुन्हेगारीपासून परावृत्त होण्याचे आवाहन घाडगे न्यूज। प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत विविध गुन्ह्यांतील आरोपींच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्यात सकारात्मक मानसिक बदल घडवून आणण्यासाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीरामपूर येथे झालेल्या आरोपी परेडमध्ये तब्बल १२१ आरोपींचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ विकचौरे यांनी उपस्थित आरोपींना मार्गदर्शन करत गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहण्याचे आणि जबाबदार नागरिक म्हणून नव्याने आयुष्य जगण्याचे आवाहन केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील १७ पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांत नोंद असलेल्या आरोपींमध्ये सकारात्मक मानसिक परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश आरोपींना त्यांच्या कृत्यांची जाणीव करून देणे, त्यांच्यामध्ये पश्चात्तापाची भावना निर्माण करणे आणि त्यांना पुन्हा गुन्ह...