खाकी आड लपलेली गुन्हेगारी पोलिस शामसुंदर जेल के अंदर
खाकीच्या आड लपलेली गुन्हेगारी : पोलिस शामसुंदर जेल के अंदर रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे नगर जिल्ह्यात घडलेले ड्रग्ज प्रकरण हे केवळ एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपकृत्य नाही; ते संपूर्ण पोलीस व्यवस्थेच्या ढासळलेल्या मूल्यव्यवस्थेचे भयावह प्रतिबिंब आहे. कायदा राबवणारा हातच जर कायद्याला हरताळ फासत असेल, तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर, हा प्रश्न आज उघडपणे उभा ठाकला आहे. एलसीबीसारख्या संवेदनशील शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी शामसुंदर गुजर थेट ड्रग्ज तस्करीत अडकतो, ही बाब जितकी धक्कादायक आहे, तितकीच ती व्यवस्थेच्या अपयशाची कबुली आहे. श्रीरामपूर व संगमनेर येथील कारवाईत जप्त केलेल्या मेफेड्रोनमधून १० किलो एमडी गायब होते, ही घटना अपघात नाही, तर अंतर्गत संगनमताशिवाय अशक्य असा गुन्हा आहे. हा मुद्देमाल कडेकोट बंदोबस्तात, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कस्टडीत असताना त्याऐवजी मैदा भरला जातो, याचा अर्थ स्टॉक रूम सुरक्षित नव्हती की सिस्टीम प्रामाणिक नव्हती? याचे उत्तर आजही मिळालेले नाही. एकटा पोलीस कर्मचारी २५ कोटींचा खेळ करतो...