राहुरीतुन ईडीबाई गायब ?
राहुरीतुन “ईडीबाई” गायब राजरंग।शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर रंगलेले राजकारण उन्हाळ्यात तापलेले असताना, मतदानाच्या आदल्या दिवशी अचानक “ईडीबाई” गायब झाल्याची चर्चा समोर येणे ही केवळ साधी घटना नाही. ही चर्चा केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, सत्ताकारण, दबावतंत्र आणि जनमानसातील अस्वस्थता यांचे प्रतीक म्हणून पाहावी लागेल. गेल्या काही दिवसांत “ईडीबाई” या रूपकातून काही राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केल्याच्या आरोपांनी वातावरण ढवळून निघाले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा कारवायांचा वापर दबाव तंत्र म्हणून केला जातो, अशी जनतेत निर्माण झालेली भावना ही लोकशाहीसाठी चिंताजनक बाब आहे. कारण निवडणूक ही विचारांची, विकासाच्या मुद्द्यांची आणि जनतेच्या प्रश्नांची लढत असायला हवी; भीती आणि दबावाची नव्हे. अशा परिस्थितीत “ईडीबाई” राहुरीतून निघून गेल्याची चर्चा पसरताच काहींमध्ये दिलासा आणि समाधानाची भावना निर्माण झाली, हेही वास्तव आहे. यावरून जनतेच्या मनात दबावमुक्त वातावरणाची किती गरज आहे, हे स्पष्ट होते. मतदाराला निर्भयपणे मतदान करता येणे, ...