मी पगारावर खुश आहे म्हणारा निघाला लाचखोर
मी पगारावर समाधानी बोर्ड लावणारा निघाला लाचखोर दिखावा।शिवाजी घाडगे "मी माझ्या वेतनात समाधानी आहे." सरकारी कार्यालयाबाहेर लावलेला हा फलक पाहिला की सामान्य नागरिकाच्या मनात त्या अधिकाऱ्याबद्दल आदर निर्माण होतो. शासनाकडून मिळणाऱ्या वेतनात समाधान मानून प्रामाणिकपणे सेवा करणारा अधिकारी अशी त्याची प्रतिमा तयार होते. पण हाच अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला, तर तो केवळ एका व्यक्तीचा गुन्हा राहत नाही; तो संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर घाला घालणारा प्रसंग ठरतो. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप उत्तम मोरे यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. एका बांधकाम कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठी एकूण बिलाच्या तीन टक्के रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. पडताळणीनंतर एसीबीने सापळा रचला आणि मोरे यांना रंगेहात पकडले. कायद्याचे काम कायदा करेल; न्यायालय अंतिम निर्णय देईल. मात्र या घटनेने समाजासमोर अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे केले आहेत. या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे कार्यालया...