Posts

Showing posts with the label लुकआऊट नोटीस जारी

भोगू कॅप्टन अशोक खरात ची कल्पना कोणी पाहीली ?

Image
भोगू कॅप्टन अशोक खरात ची कल्पना कोणी पाहीली? श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित ‘भोगू कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक तपशील समोर येत असून, तपासाची व्याप्ती आता केवळ अशोक खरातपुरती मर्यादित न राहता त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट होत आहे. जमीन खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर विशेष तपास पथक  अशोक खरातच्या बंगल्यावर कारवाईसाठी गेले असता त्याची पत्नी कल्पना खरात हिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ती तेथून फरार झाली. यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली असून, तिचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री पोलिसांनी अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. या कारवाईमुळे प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात तसेच आणखी तीन जणांविरुद्ध फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय, गुरुवारी पुन्हा एका महिलेने अशोक खरातविरुद्...