महात्मा फुले विद्यापीठात झेंडावंदन
महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न विद्यार्थी, कर्मचारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शेतकरी यांनी देशाच्या उज्वल भविष्यासाठी कार्य करावे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार सध्या आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळ पर्वात आहोत. देशाला स्वांतत्र्य मिळण्यासाठी कित्येक स्वातंत्र्य विरांनी आपले बलिदान दिले आहे. हा देश घडविण्यासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक थोर पुरुषांनी योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने मोठी प्रगती केली आहे. 6 ते 7 दशकात आपला देश अन्नधान्य आयात करत होता. आता आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण होवून इतर देशांना अन्नधान्य निर्यात करत आहोत. आपले यान चंद्राकडे झेपावत आहे, आयटी क्षेत्रात आपण भरारी घेत आहोत. विद्यार्थी, कर्मचारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शेतकरी यांनी देशाच्या उज्वल भविष्यासाठी कार्य करावे असे आवाहन ध्वजारोहन प्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 77 वा स्व...