Posts

Showing posts with the label सिंचन

पाट पाणी उन्हाळी आवर्तन साठी अर्ज करा

Image
उन्हाळी सिंचनासाठी पाटाचे पाणी मागणी अर्ज करा  नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध धरणे व कालव्यांमधून उन्हाळी हंगाम २०२५–२६ साठी उभी हंगामी चारा पिके, ऊस तसेच फळबागांसारख्या बारमाही पिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी तसेच पाणी वापर संस्थांनी नमुना क्रमांक ७ मधील अर्ज संबंधित सिंचन शाखा कार्यालयात २४ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सो. अ. शहाणे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उन्हाळी सिंचनासाठी पाणीपुरवठा गोदावरी उजवा व डावा तट कालवा, गंगापूर डावा तट कालवा, आळंदी उजवा व डावा तट कालवा तसेच पालखेड उजवा तट कालवा यांच्या लाभक्षेत्रात करण्यात येणार आहे. तसेच दारणा, गंगापूर, मुकणे, भावली, वाकी, भाम, कडवा, वालदेवी, गौतमी-गोदावरी, काश्यपी आणि आळंदी या धरणांच्या जलाशयांमधूनही पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय दारणा, गोदावरी, कडवा व आळंदी नद्...