माणुसकीची भिंत
माणुसकीची भिंत या उपक्रम प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका सल्लागार सलीम शेख यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व माणुसकीचे भिंत या उपक्रमाचे उद्घाटन तसेच 26 दिव्यांग बांधवांना अंतोदय रेशन कार्ड वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हाध्यक्ष अँड. लक्ष्मण पोकळे होते. प्रास्ताविक उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले जिल्हा समन्वयक निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांनी केले. देवळाली प्रवरा येथे श्री स्वामी समर्थ बाबुराव पाटील महाराज संस्कृतिक भवन येथे दिव्यांग मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरामधे देवळाली प्रवरा येथील दिव्यांगाना 26 अंत्योदय रेशन कार्ड चे वाटप,व मानुसकिची भिंत उपक्रमाचा शुभारंभ देवळाली प्रवरा नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगरसेवक अजित चव्हाण मुख्याधिकारी अजित निकत, ह.भ.प बाळकृष्ण खांदे, ह.भ.प नानासाहेब शिंदे, ह.भ.प.जालिंदर साळुंके, जिल्हा सचिव हमीद शेख ,प्रहार श्रमिक संघटनेचे बाळासाहेब कराळे यांच्या उपस्थितीत करण्यात आल...