तृतीयपंथीय प्रमाणपत्र व ओळखपत्र साठी ऑनलाईन अर्ज करा
जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करा तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावुन घेत त्यांच्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्याबरोबरच तृतीयपंथीयांना प्राथमिक हक्क प्राप्त करून देण्यासाठी तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र, ओळखपत्र जारी करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाने transgender.dosje.gov.in हे पोर्टल विकसित केले आहे. जिल्हयातील सर्व तृतीयपंथीयांनी नोंदणी करुन तृतीयपंथी असल्याबाबत प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे व शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन राधाकिसन देवढे, सहायक आयुक्त, समाज कल्याण अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ओळखपत्र, प्रमाणपत्रासाठी तृतीयपंथी कुठल्याही ठिकाणावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. ट्रान्सजेन्डर धोरणानुसार एखाद्याची ओळख दर्शविण्यासाठी आणि पासपोर्ट, आधार व इतर कागदपत्रांमध्ये बदल करण्यासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग केला जावू शकतो. त्यामुळे सदर ओळखपत्र, प्रमाणपत्र तृतीयपंथीयांसाठी महत्वाचे आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी स्वंयघोषणापत्र, प्रत...