श्रीरामपूरात गोळी बारात बंटी जहागीरदार ठार
बंटी जहागीरदार यांची गोळ्या झाडून हत्या हल्लेखोर पसार राहुरी श्रीरामपूरात बुधवारी गोळीबाराचा थरार झाला असून दुपारी अडीच्या सुमारास कब्रस्तानातील एक अंत्यविधी आटोपून परतणारे बंटी जहागीरदार यांच्यावर सेंट्लुक हॉस्पिटलच्या गेट समोर थांबलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला.या गोळीबारामध्ये ते मरण पावले कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून बंटी जहागीरदार हे आपले मित्र अमीन हाजी याच्या बाईकवर मागे बसून घरी परत चालले होते.संत लूक हॉस्पिटलच्या ओपीडीच्या गेट जवळ ते आले असता आधीपासून तेथे उभे असलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने त्यांना मागून दगड मारला.दगड लागल्याने ते मागच्या मागे गाडी वरून उतरले व त्यांनी तो दगड परत त्या हल्लेखोरावर भिरकावला. त्याक्षणी हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूल मधून बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या पोटात, पायाला तसेच मागून पाठीवर सुद्धा गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.यानंतर ते खाली कोसळले.त्याचवेळी मागून येणाऱ्या अनेक लोकांनी त्यांना उचलून कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ते...