सत्कार पडत्या काळात मदत करणाऱ्यां हाताचा !
साथ ॥ घाडगे न्यूज
आपल्या यशस्वी जीवनप्रवासात, विशेषतः जीवनाच्या खडतर काळात साथ देणाऱ्या, मदत व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिमाखदार स्नेहसत्कार सोहळा संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा पूर्वी श्रमिक व्यावसायिक आणि सध्या हरिभक्त पारायण कीर्तनकार असलेले राजेंद्र धनराज चोरडिया यांनी आयोजित केला होता. या सोहळ्यास अगदी मोजकेच स्नेहजन उपस्थित होते. हुरडा, मिष्टान्न भोजन व स्नेहसत्कार
नातेवाईकांपासून ते समाजातील अनेक घटक असे असतात की, ज्यांनी आयुष्यात मोठे सहकार्य केलेले असते; मात्र त्यांचे साधे आभारही कधी व्यक्त केले जात नाहीत. मात्र राजेंद्र चोरडिया यांनी आपल्या उद्योग-व्यवसायात मदत व सहकार्य करणाऱ्या सर्व कष्टकरी घटकांचा स्नेहसत्कार करून एक वेगळाच आदर्श घालून दिला. ऊसतोडणी कामगार, टोळी मुकादम, अधिकारी, ट्रक चालक, फिटर, कीर्तनकार अशा सर्वांचा त्यांनी सन्मान करून मनापासून आभार मानले.
“मी आज जे काही आहे, ते तुमच्या मदतीमुळे आणि सहकार्यामुळे आहे,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या जीवनप्रवासाची आठवण करून दिली. अनेक वर्षे खडतर काळात श्रमाच्या स्वरूपात तसेच आर्थिक मदत मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कमी शिक्षणामुळे लिहिता-वाचताही येत नव्हते; मात्र हरिपाठाच्या संगतीने, हरिकृपेने आणि प्रयत्नांमुळे धार्मिक ग्रंथ वाचनापर्यंतचा ज्ञानप्रवास घडला, असे त्यांनी नमूद केले.
बालपणी हाताला मिळेल ते काम केले—दिवसाला अवघे ५० रुपये मजुरीपासून ते शेतात नांगरणी, हमालीपर्यंत विविध कामे केली. पुढे दोन भाऊ राहुरी फॅक्टरीत कामाला राहिले, नंतर प्रवरा साखर कारखान्यात गेले. ऊसतोडणीच्या टोळ्या तयार केल्या, वाहतूक व्यवसाय सुरू केला आणि दुकानही उभारले. पुढे मुले उच्चशिक्षित झाली, संभाजीनगर येथे स्थायिक झाली आणि उद्योग-व्यवसायात मोठी प्रगती झाली.
या यशामागे ज्यांनी पडत्या काळात मदत केली, त्यांच्या कृतज्ञतेपोटी हा मनाला आनंद देणारा स्नेहसत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. अनेकदा लोक आपल्याला मदत करणाऱ्यांना विसरतात किंवा अपेक्षेप्रमाणे वागले नाहीत म्हणून दुरावा ठेवतात. आपण मोठ्या व्यक्तींच्या पुढेच पुढे करतो; मात्र गरिबीत साथ देणाऱ्या कष्टकरी हातांचा सन्मान जेव्हा कोणताही स्वार्थ न ठेवता केला जातो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने मान उंचावणारा ठरतो.
राग, द्वेष, अहंकार आणि स्वार्थाच्या पलीकडे जाऊन कोणताही हेतु न ठेवता केलेला सन्मान हे खरे सत्कर्म आणि सत्कार्य आहे. हयात नसलेल्या आई-वडिलांची आणि मदत करणाऱ्यांची आठवण करून देताना “मी कसा घडलो” हेही राजेंद्र चोरडिया यांनी यावेळी भावनिक शब्दांत मांडले.
सध्या ते कीर्तनसेवा करत असून महाराष्ट्रातील ५० कीर्तनकारांना एकत्र जोडण्याचे कार्य त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे ते कीर्तनाचा मोबदला घेत नाहीत. “आज माझ्याकडे आहे; आपली किर्तन सेवेतील ज्ञान आपण देतो,” एका हरिपाठाने मला हरिचा लळा लावला आणि माझ्या जीवनाला दिशा मिळाली, अशी भावना त्यांच्या ठाई होती. पुस्तके न वाचता येणारन माणसे वाचली अण् माणुसकीच दर्शन घडवून आणल
त्यांचे मोठे बंधू रमेश चोरडिया उत्तम हाॅलीबाल पटू व व्यावसायिक आहेत दुसरे गोपालक ललित चोरडिया यांच्या माध्यमातून गावरान गाय संभाळ करून गोशाळा व व्यावसायिक तर तिसरा विजय पुण्यात बहीणी ,पुढची पिढी उच्च शिक्षित झाली संगणक, अॅनराॅईड मोबाईल वापरणारे मात्र मात्र कार्यक्रमात एक मेकांना भेटून अस्थेने बोलत होती जणू काही प्रतेकाला राजेंद्र चोरडिया यांच्या बद्दल सांगायचे होते
यावेळी
श्री संत टाका स्वामी महाराज वेरूळ , हरिभक्ती परायण रवींद्र महाराज हरणे मुक्ताईनगर , हरिभक्त पारायण नारायण, महाराज देवकर पंढरपूर, हरिभक्त पारायण गणेश महाराज कोल्हे रामनगर जालना ,ह भ प गोपाळ महाराज शास्त्री, ह भ प कैलास महाराज गवळी ह भ प महारुद्र महाराज ,
मात्र सुर्य मावळतीकडे घड्याळाचे काटे पुढ सरकवत होता मात्र कार्यक्रम घनो अच्छा हुओ म्हणत आनदाई आठवण घेत परत घराकडची ओढ
करीत येथून पाय निघत नसताना जड पावलांनी घराकडे निघाले आज तोंडावर गोड बोलणारे व पाठ फिरवताच माघारी वाईट चर्चा करणार्या साठी हा कार्यक्रम दिप स्तंभ ठरला हे मात्र नक्की
Comments
Post a Comment