Posts

Showing posts with the label प्रहार चा पुढाकार

मध्यान भोजन सुरु

Image
मध्यान भोजन प्रसादनगर येथे मध्यान्न भोजन सुरु.. प्रहार श्रमिक सेवा संघाच्या प्रयत्नांतून देवळाली प्रवरा हद्दीतील असलेल्या प्रसादनगर भागात सोमवार पासून महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मध्यांन भोजन सुरु असलेल्या    राज्यातील असंघटीत कामगारांना देण्यात येणारे मध्यान भोजन   प्रसादनगर भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तैनुर पठाण यांचे हस्ते  सुरू करण्यात आले.       प्रसंगी प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस, सचिव बाळासाहेब कराळे, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष नवनाथ चव्हाण, प्रहार जनशक्ती पक्षाच्या राहुरी फॅक्टरी महीला शहर अध्यक्ष रजनी कांबळे, उपाध्यक्ष वंदना कांबळे, राहुरी फॅक्टरी शहर उपाध्यक्ष एकनाथ वाणी, गणेश भालके, संघटक प्रभाकर कांबळे आणि लाभधारक असंघटित कामगार उपस्थीत होते.        प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढूस म्हणाले की, देवळाली प्रवरा शहरामध्ये प्रहाचे माध्यमातून पाच ठिकाणीं कामगार मंडलाचे वतीने देण्यात येणारे मध्याणं भोजन व्यवस्था केली असून प्रसादनगर भागातील जवळपास पस्तीस कामग...