शिक्षक पात्रता परिक्षेची गरज आहे
शिक्षक प्रात्रता परीक्षेची गरज आहे तरंग।शिवाजी घाडगे शिक्षक हा समाजाचा शिल्पकार मानला जातो. भावी पिढी घडविण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, त्या शिक्षकांची निवड गुणवत्ता आणि पारदर्शकतेच्या निकषांवर व्हावी, याबाबत कोणाचेही दुमत असू शकत नाही. याच उद्देशाने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीची संकल्पना पुढे आली. मुळात आगोदर जे अभ्यासक्रम आहेत ते पुर्ण करताना परिपूर्ण ज्ञान दिलेले असतेच मग पुन्हा टी ई टी कशा साठी घ्यायची व यात नेमक कोणाच भल होते एक तर गेले अनेक दिवसांपासून शिक्षक भरले गेले नाहीत त्याचा परिणाम विद्यार्थाच्या शिकवण्यावर होतो मात्र अलीकडे उघडकीस आलेल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकारानंतर या परीक्षेच्या विश्वासार्हतेबरोबरच तिच्या उपयुक्ततेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टीईटीची प्रश्नपत्रिका फुटते, परीक्षा रद्द होते, चौकशा सुरू होतात, आरोपी अटक होतात आणि काही दिवसांत सर्व काही शांत होते. मात्र या सगळ्या गोंधळात लाखो उमेदवारांचे काय? अनेक वर्षे अभ्यास करून, आर्थिक अडचणींवर मात करून आणि शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून परीक...