नगरच्या माजी व संध्या परभणीच्या क्रीडा अधिकारी कविता नंवादे लाच घेताना अटक
अहिल्यानगर च्या माजी क्रिडा अधिकारी कविता नावंदेंना लाच घेताना अटक छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर येथील कारकिर्दीत वादग्रस्त ठरलेल्या परभणीच्या जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांच्यासह क्रिडा अधिकारी नानकसिंग बस्सी (रा.नांदेड) यांना अडीच लाख रूपयांची मागणी करीत दीड लाख रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने गुरूवारी (दि.27) दुपारी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिले काढण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. आपल्या कार्यपद्धतीने वादग्रस्त ठरलेल्या क्रिडा अधिकारी नावंदे यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेना ठाकरे गटाचे आ.डॉ.राहूल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.राजेश विटेकर यांनी विधानसभेत बुधवारीच राज्य सरकारकडे विचारणा करीत त्यांच्यावरील आरोपांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. दुसर्याच दिवशी लाच घेताना नावंदे या जाळ्यात अडकल्याने लोकप्रतिनिधींच्या तक्रारींवर शिक्कामोर्तब झाला आहे. याबाबत माहिती अशी, 2024 मध्ये एका क्रिडा अकॅडमीने क्रिडा स्पर्धा घेतल्या होत्या. त्यासाठीचे पाच लाख रूपये व त...