Posts

Showing posts with the label दोन दिवस चालणार

पुण्यात साखर परिषद आयोजन

Image
कृषि महाविद्यालय, पुणे येथे साखर व संलग्न उद्योग परिषद 2024 चे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे, मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनियरिंग सर्विसेस लि. पुणे, साखर आयुक्तालय, पुणे आणि दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साखर व संलग्न उद्योगांचे चक्रीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक शाश्वततेसाठी साखर व संलग्न उद्योग परिषद 2024 चे आयोजन  8 ते 9 ऑगस्ट, 2024 रोजी कृषि महाविद्यालय, पुणे येथील डॉ. शिरनामे सभागृहात करण्यात आलेले आहे.           महाराष्ट्र राज्यातील साखर उद्योगाचे राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. परंतु, सद्य परिस्थितीत हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे साखर कारखानदारीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीकोनातून अत्याधुनिक व शाश्वत  तंत्रज्ञानाबद्दलची जागरूकता बहुतांश साखर कारखान्यांकडे नसल्याने आजही पारंपरिक पद्धतींचा अवलंब होत आहे. त्यामुळे पर्यावरणीय गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येत...