विद्यापीठ डिजिटल तंत्रज्ञान-कुलगुरू डॉ पी जी पाटील
डिजिटल तंत्रज्ञान विद्यापीठ विकसीत डिजीटल तंत्रज्ञानाचा व्यापारी तत्वावर प्रसार होणे गरजेचे - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्पांतर्गत विविध हवामान अद्ययावत तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. यामध्ये स्वयंचलीत हवामान केंद्र, आय.ओ.टी. तंत्रज्ञान, आटो.पी.आय. तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता, रोबोटीक्स तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान व्यापारी तत्वावर विकसीत होऊन शेतकर्यापर्यंत पोहचण्यासाठी नविन उद्योजक, स्वयंसेवी संस्था, कंपनी यांची आवश्यकता आहे. विद्यापीठ हे तंत्रज्ञान देण्यास तयार आहे. परदेशात औद्योगीक क्षेत्राच्या मागणीनुसार संशोधन केले जाते. त्याच धर्तीवर या विद्यापीठात संशोधन हाती घेण्यात येणार आहे. यासाठी भारत सब कॉन्टीनंट अॅग्री फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यामुळे नविन तंत्रज्ञान व्यापारी तत्वावर प्रसार होण्यास मदत होणार आहे. त्याचा फायदा शेतकरी व कृषि क्षेत्रातील उद्योजकांना होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ...