मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर पदवी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ मानद पदवीचा बहुमान महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सन्मान घाडगे न्यूज । प्रतिनिधी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात रविवारी सकाळी १० वाजता हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात येणार असून राज्याच्या प्रशासनात तसेच विकासाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाची दखल घेत हा गौरव केला जात आहे. सन १९६९ मध्ये स्थापन झालेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे राज्यातील अग्रगण्य कृषी शिक्षण व संशोधन केंद्र आहे. शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्ताराच्या माध्यमातून दहा जिल्ह्यांमधील शेतकरी आणि विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विद्यापीठ करत आहे. विद्यापीठाच्या वतीने दर दोन वर्षांनी दीक्षांत समारंभाचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात कृषी व इतर शाखांतील पदवीधरांना राज्यपाल तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पदव्या...