पाणी पट्टी व्याज माफी साठी प्रयत्न
पाणीपट्टी व व्याज माफ होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील प्रवरा कालव्यांच्या कामाबाबतचा आढावा जलसंपदा विभागाकडून आकारण्यात येणारी पाणीपट्टी आणि त्यावरील व्याज माफ करण्याबाबतचा ठराव आज जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत लाभार्थी शेतकऱ्यांकडून संमत करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेवून शासन स्तरावर निर्णय होण्याबाबत प्रयत्न करु. अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रवरा कालव्यांच्या कामाबाबतचा आढावा महसूलमंत्री श्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, तुकाराम बेंद्रे, मच्छिंद्र थेटे, रामभाऊ भुसाळ, अशोकराव म्हसे यांच्यासह लाभक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थि...