कडधान्य संशोधक केंद्राने विकसित केलेले बियाने अव्वल-डाॅ कूटे
कडधान्य संशोधन केंद्राने विकसित केलेले वाण देशात अव्वलस्थानी - प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या कडधान्य संशोधन केंद्राने विकसित केलेले हरभरा, तुर, मुग, उडीद व चवळी या कडधान्ये पिकांचे वाण उत्पन्न व उत्पादनामध्ये देशात अव्वल स्थानी असून ते सर्वांच्याच पसंतीस देखील उतरलेले आहेत असे प्रतिपादन कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी गुंडेगाव, ता. नगर येथील शेतकर्यांना मार्गदर्शन करताना केले. कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या वतीने खरीप 2023 या हंगामामध्ये राहुरी, नगर, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर तालुक्यातील तुर उत्पादक शेतकर्यांच्या शेतावर तुरीची आणि तुर व सोयाबीन या पिकांची आंतरपीक म्हणून आद्यरेखा प्रात्यक्षिके राबविण्यात आलेली आहेत. या आद्यरेखा प्रात्यक्षिकांची पाहणी करून शेतकर्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कुटे हे बोलत होते. यावेळी किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ यांनी तूर, मुग व उडीद या पिकांवर प्रादुर्भाव झालेल्या किडींचे सर्व्हेक्षण करुन शेतकर...