देशी बियाणांचा प्रसार व्हावा -जिल्हाधिकारी
राहीबाईंचे देशी बियाणांचे ज्ञान कृषी विभागाने जनतेपर्यंत पोहचवावे - सिध्दाराम सालीमठ *कोंभाळणें येथील बीज बँकेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट ! पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांच्या मार्गदर्शनाने कोंभाळणे येथे उभ्या राहिलेल्या देशातील पहिल्या देशी बियाणे बँकेला अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी भेट दिली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या विषयाचे ज्ञान पोहोचले पाहिजे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. यावेळी संगमनेर प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे हेही उपस्थित होते. देशी बियांच्या संवर्धनासाठी देश आणि विदेशात प्रसिद्ध असलेल्या बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांची भेट घेऊन या विषयाची सविस्तर माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. राहीबाई यांचे पारंपरिक बियाणे संवर्धनातील ज्ञान व अभ्यास बघून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. राहीबाई पोपेरे यांनी जतन केलेल्या विविध वाणांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना करून दिली. त्यांच्या संग्रही असलेले भाजीपाला बियांचे संच यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिले. राहीबाई ...