Posts

Showing posts with the label संशोधनाचा फायदा

फुले व हालोळ कृषी विद्यापीठांन केला सामंजस्य करार

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व गुजरात नैसर्गिक कृषि विज्ञान विद्यापीठ, हालोळ यांच्यामध्ये सामंजस्य करार            सध्याच्या हवामान बदलाच्या परीस्थितीमध्ये शेतीवर होणारे दुष्परिणाम व शेतीमधील हरीत वायुंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी पर्यावरण पुरक, कमी खर्चाच्या व रसायन अवशेष मुक्त अन्नधान्य निर्मिती या उद्देशाने नैसर्गिक शेती क्षेत्रातील शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व गुजरात नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठ, हालोळ यांच्यामध्ये  गुजरात मधील गांधीनगर राजभवनामध्ये गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु कर्नल कमांडंट डॉ. पी. जी. पाटील व गुजरात नैसर्गिक कृषि विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सी. के. टिंबाडीया यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी गुजरात नैसर्गिक कृषि विज्ञान विद्यापीठासोबत एकूण २२ कृषि विद्यापीठे, सामाजिक संस्था व फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले.           ...