Posts

Showing posts from May, 2026

विचारांचे उत्तर विचारांनीच...

Image
विचारांना उत्तर विचारांनीच… एका मेका गच्चाडू अवघी फेकू शाई   रणसंग्राम।शिवाजी घाडगे  लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कधी राजकीय मंचावरून व्यक्त होतो, तर कधी सामाजिक किंवा धार्मिक विषयांवर भाष्य करताना समोर येतो. मात्र, मतभेदांचा सामना करताना संयम, संवाद आणि विवेक या मूल्यांची जपणूक होणे तेवढेच आवश्यक असते. अलीकडे विकास लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक  अथवा काळे वंगण फेकल्याची घटना  ही केवळ एका व्यक्तीवरील प्रतिक्रिया नसून समाजातील वाढत्या असहिष्णुतेचे प्रतीक मानावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी ह भ प संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांकडून शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली. मात्र, ही केवळ शाईफेक नसून काळे वंगण अंगावर ओतल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदाय, काही कीर्तनकार आणि धार्मिक प्रवचनांच्या देवघेव पद्धतीबाबत भाष्य केले होते. काही महाराजांच...

तक्रार निवारण दिन संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या उपक्रमाचे स्वागत

Image
तक्रार निवारण दिनाचे सुदर्शन! उपक्रम।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय पोलीस ठाण्यांमध्ये शुक्रवारी “तक्रार निवारण दिन” उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा पोलीस दलाचा नव्याने कार्यभार स्वीकारलेले जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेटी देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी पोलीस यंत्रणेमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पोलीस ठाण्यांतील प्रलंबित तक्रारी, कायदा व सुव्यवस्था, कर्मचारी शिस्त आणि नागरिकांशी संवाद या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला आहे.  त्यामुळे कठोर आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर नगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडूनही जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या नगर जिल्ह्यात पोलीस खात्याची प्...

जैसी करणी वैसी भरणी भोगू अशोक खरात वर काळाचा आसूड

Image
जैसी करणी वैसी भरणी; स्वयंघोषित ‘कॅप्टन’वर काळाचा आसूड   श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे  नाशिक येथील स्वयंघोषित “कॅप्टन” म्हणून चर्चेत आलेला अशोक खरात  सध्या विविध गुन्हे, चौकशी आणि प्रकृतीच्या समस्यांमुळे अडचणीत सापडला आहे. एकेकाळी मोठेपणाचा आव आणत फिरणाऱ्या या व्यक्तीवर आता काळानेच उलट वार करून आसूड ओढला असल्याची  चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. “जैसी करणी वैसी भरणी” अशीच प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात सध्या  शिर्डी पोलीस ठाण्यात तो पोलीस कोठडीत असून  पुन्हा नाशिक पोलिस त्याचा ताबा घेवु शकतात . एका हाताला लकवा झाल्याने त्याची प्रकृती खालावली असून रक्तदाब व शुगरसाठी उपचार सुरू आहेत. एकेकाळी मोठ्या थाटामाटात फिरणाऱ्या अशोक खरात याला आता न्यायालयीन आणि वैद्यकीय संकटांचा सामना करावा लागत आहे. त्याची वेळ घेऊन भोळे भाबडे भक्त आपल्याला गुण येईल या आशेवर असायची आता मात्र खरातची शिर्डी पोलीसांनी वरात काढली असून खरातची वेळ खराब असून तो देखील आता याचना करीत असुन त्याला दिवसा चांदण्या दिसत आहेत.  राहाता न्याय...

तामिळनाडूचे खरे नायक विजय थलापती

Image
 तामिळनाडूचा निकाल… राजकारणाला नवा दिशादर्शक राजरंग।शिवाजी घाडगे  तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता नेते विजय थलापती यांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या राजकीय घडामोडींनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. पारंपरिक राजकीय समीकरणांना छेद देत, नव्या चेहऱ्याने आणि नव्या आश्वासनांनी मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता या निकालातून दिसून आली. हा निकाल केवळ सत्तांतराचा नसून, जनतेच्या अपेक्षांमध्ये होत असलेल्या बदलांचा संकेत मानावा लागेल. या निवडणुकीत लोकाभिमुख योजनांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला. महिलांसाठी मासिक आर्थिक मदत, बेरोजगारांसाठी भत्ता, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, तसेच सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना या सगळ्यांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला. या योजनांमुळे केवळ आश्वासनांची यादी नव्हे, तर “सरकार आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्यक्ष मदत करू शकते” हा संदेश पोहोचवण्यात यश आले. याहून महत्त्वाची बाब म्हणजे, विजय यांनी डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासह संविधानिक मूल्यांचा उल्लेख करत दिलेला संदेश. सामान्य कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देऊन त्याला आमदार बनवणे ही कृती प...

अक्षय कमळाच्या विजयात दडली जबादारीची जाणीव

Image
 अक्षय कमळाच्या विजयात  दडलेली जबाबदारीची जाणीव  राजरंग।शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हा केवळ एका उमेदवाराच्या विजयापुरता मर्यादित नाही, तर तो स्थानिक राजकारणातील भावनिक लाट, पक्षनिष्ठा आणि वारशाच्या सातत्याचा महत्त्वाचा दाखला ठरला आहे. आमदार अक्षय कर्डीले यांनी मिळवलेला दणदणीत विजय हा भाजपासाठी गड कायम राखणारा ठरला, पण त्यामागे असलेल्या भावना आwwwwwww1wwqq1qqqwswwwणि वास्तव याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी अजून भरून निघालेली नाही. त्यांनी उभारलेली राजकीय ताकद, मतदारांशी असलेला जिव्हाळा आणि विकासकामांची परंपरा यामुळेच राहुरीत ‘कमळ’ पुन्हा फुलले होते. त्याच वारशाची धुरा आता त्यांच्या पुत्राच्या खांद्यावर आली आहे. मात्र, वारसा मिळवणे जितके सोपे दिसते, तितके तो टिकवणे कठीण असते हे वास्तव नव्या आमदारांसमोर उभे आहे. या निवडणुकीत सहानुभूतीची लाट, पक्षयंत्रणेची ताकद आणि राज्य-केंद्रातील सत्तेचा प्रभाव हे सर्व घटक अक्षय कर्डीले यांच्या बाजूने होते. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेच...

राहुरीचे आमदार अक्षय कर्डीले

Image
राहुरीचे आमदार अक्षय कर्डीले  राजरंग।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डीले यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपाचा गड कायम राखला आहे. कर्डीले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर तब्बल १,१२,५८७ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. आहे अक्षय कर्डीले यांनी भाजपा युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पुर्ण केली असून जिल्हा सहकारी बँक चे संचालक म्हणून देखील काम केले असून  लेकरासाठी आई फिरली मतदारसंघात… दुःख बाजूला ठेवून उभा राहिलेला संघर्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक हृदयस्पर्शी चित्र संपूर्ण मतदारसंघाने अनुभवले. पतीच्या निधनाचे दुःख मनात दडपून, लेकराच्या भवितव्यासाठी आई स्वतः रस्त्यावर उतरली… आणि याच भावनिक क्षणांनी प्रचाराला वेगळीच ऊर्मी दिली. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आयुष्यभर जनतेसाठी झटणारे कर्डीले यांनी जवळपास तीस वर्षे आमदार म्हणून काम केले, पण त्यांनी कधीच घराचा उंबरठा ओलांडून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नव्हता. मात्र परिस्थिती बदलली… आणि त्याच घरातून...

उद्या मतदान यंत्रातून येणार राहुरीचा आमदार

Image
उद्या मतदान यंत्राच्या पोटातून येणार राहुरीचा आमदार घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी ४ एप्रिल रोजी जाहीर होणार असून, राहुरी कॉलेज येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, राहुरीचा पुढील आमदार कोणत्या पक्षाचा असेल हे उद्या स्पष्ट होणार आहे. अक्षय कर्डीले यांना वाढदिवसां निमित्त आमदारकीची गिप्ट मिळणार की वेंकटरमना गोविंदा  होणार हे समजायला अवघा एक दिवस उरला आहे  या पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डीले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, तसेच अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, अर्थव म्हसे आणि महेश हापासे यांनी आपले नशीब आजमावले आहे. एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदारांपैकी सुमारे ५०.७५ टक्के म्हणजेच अंदाजे १लाख ६९ हजार ४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांचा प्रतिसाद मध्यम असला तरी निवडणुकीची चुरस कायम राहिली आहे. रिंगणात सहा उमेदवार असले तरी खरी लढत भाजपचे अक्षय कर्डीले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे यांच्...

अण्णा एका वडिलधाऱ्या सावलीचा अंत , पण आठवणींचा अनंत प्रकाश

Image
अण्णा… एका वडिलधाऱ्या सावलीचा अंत, पण आठवणींचा अनंत प्रकाश         @शिवाजी घाडगे “अण्णा…” ही हाक आजही कानात घुमते आहे. पण आता ती फक्त आठवणीत उरली आहे. आजच्या धावपळीच्या, बदलत्या काळात “अण्णा” अशी आपुलकीची, जिव्हाळ्याची हाक ऐकायला मिळणं दुर्मिळ झालं आहे. डोक्यावर साधी टोपी, अंगात पायजमा-शर्ट किंवा तीन गुड्याचा सदरा, चेहऱ्यावर शांतता, वागण्यात संयम, बोलण्यात मितपणा आणि मनात अपार कर्तव्यभाव ही ओळख ज्या व्यक्तिमत्त्वाची होती, ते म्हणजे आमचे आधारवड सिताराम रंगनाथ घाडगे (वय ८४). राहुरी फॅक्टरी परिसरातील मुळा कॉलनीत वास्तव्यास असलेले अण्णा यांचे मूळ गाव कणगर. कणगर-तांभेरे रस्त्यावरील माळावर वसलेल्या साध्या मातीच्या छपरात त्यांचा जन्म झाला. वडील रंगनाथ बाबुराव घाडगे आणि आई जयाबाई यांच्या कुटुंबात नऊ अपत्यांचा मोठा परिवार रामचंद्र, सोन्याबापू, सिताराम, बन्सी, गोरक्षनाथ, मच्छिंद्र असे सहा भाऊ आणि विठ्ठाबाई, किसनबाई, लक्ष्मीबाई या तीन बहिणी. अजून आयुष्य समजायचं बाकी असतानाच वडिलांचे छत्र हरपले आणि संसाराच्या आभाळाला भेग पडली. त्या एका घटनेने घरात अंधार दाटला. पण आई ...