एलएस एमएसी चे उद्घाटन कुलगुरु पाटील याच्या हस्ते
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते एलसी-एमएस या उपकरणाचे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाच्या किडनाशक अंश विश्लेषण प्रयोगशाळेस एलसी-एमएस/एमएस हे उपकरण मिळाले आहे. राज्यातील चारही कृषि विद्यापीठांपैकी फक्त महात्मा फुले कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागामध्ये अखिल भारतीय किडनाशक अंश पृथःकरण योजना कार्यरत आहे. या प्रयोगशाळेला एन.ए.बी.एल.चे नामांकण प्राप्त आहे. या योजनेला भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचा 75 टक्के अर्थसहाय्य व महाराष्ट्र शासनाचे 25 टक्के अर्थसहाय्यातून किडनाशक अंश विश्लेषण प्रयोगशाळेस एलसी-एमएस/एमएस हे उपकरण खरेदी केले आहे. या उपकरणाची पाहणी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी नुकतीच प्रयोगशाळेला भेट देवून या उपकरणाचे उद्घाटन केले. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव अरुण आनंदकर, नियंत्रक सदाशिव पाटील, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठा...