मांजरीत बाप-लेकावर बिबट्याचा हल्ला
दिवसाढवळ्या बाप-लेकावर बिबट्याची झडप; प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचाव मांजरीत थरारक घटना; दोघे जखमी घाडगे न्यूज। प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील मांजरी येथील मळहद वस्ती परिसरात गुरुवारी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या बाप-लेकावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली. ऊसाच्या फडात पाणी भरण्यासाठी गेलेले भीमराज सखाराम विटनोर (वय ४८) आणि त्यांचा मुलगा दिगंबर विटनोर (वय १७) यांच्यावर बिबट्याने झडप घातली. वडिलांवरील हल्ला पाहून दिगंबरने प्रसंगावधान राखत बिबट्यावर दगडफेक केली. त्यामुळे बिबट्याने भीमराज यांना सोडून दिगंबरकडे धाव घेतली. मुलाला वाचविण्यासाठी भीमराज यांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावून आल्याने बाप-लेकाची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. भीमराज विटनोर हे गुरुवारी सकाळी मुलगा दिगंबर याच्यासोबत ऊसाच्या फडात पाणी भरण्यासाठी गेले होते. ऊस दाट असल्याने बिबट्या कुठे लपून बसला आहे, याचा अंदाज त्यांना आला नाही. दोघे...