तक्रार निवारण दिन संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या उपक्रमाचे स्वागत
तक्रार निवारण दिनाचे सुदर्शन! उपक्रम।शिवाजी घाडगे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय पोलीस ठाण्यांमध्ये शुक्रवारी “तक्रार निवारण दिन” उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा पोलीस दलाचा नव्याने कार्यभार स्वीकारलेले जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेटी देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी पोलीस यंत्रणेमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पोलीस ठाण्यांतील प्रलंबित तक्रारी, कायदा व सुव्यवस्था, कर्मचारी शिस्त आणि नागरिकांशी संवाद या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यामुळे कठोर आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर नगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडूनही जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या नगर जिल्ह्यात पोलीस खात्याची प्...