जि प अभियंत्यांवर गंभीर आरोप
जि.प. अभियंत्यांवर निविदा प्रक्रियेत वशिल्याचा आरोप प्रतिनिधी- जिल्हा परिषच्या कार्यकारी अभियंता (दक्षिण व उत्तर) यांनी कामांच्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता व वशिलेबाजी केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम विभागाकडे करण्यात आली असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे निवेदनात टेंडर प्रक्रियेत झालेल्या विविध त्रुटींवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी कार्यकारी अभियंता (दक्षिण व उत्तर) यांनी बी-1 निविदा जाहीर केल्या. मात्र, जाहीर करण्यात येणाऱ्या प्रत्येक निविदेची माहिती जिल्हा परिषदेच्या सूचना फलकावर लावणे बंधनकारक असतानाही, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही नोटीस बोर्डवर माहिती प्रदर्शित केली नाही. इतकेच नव्हे तर तब्बल 40 कामांची यादी फक्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करून टेंडर प्रक्रिया राबविली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर निविदांसाठी 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2025 अशी मुदत देण्यात आली होती. मात्र, संपूर्ण प्रक्रिया गुप्ततेत राबवून काही ...