Posts

Showing posts with the label mpkv चा उपक्रम

शेतकरयाना मिळणार ॲप वर कृषी सल्ला

Image
फुले बळीराजा डिजिटल कृषि सल्ला ॲप्लीकेशेन  हे पीक निहाय व वेळनिहाय शेतकर्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे ॲप आहे. हे असे व्यासपीठ आहे की ज्याद्वारे त्यात नोंदणी केलेल्या शेतकर्याला त्याच्या कृषि विषयक प्रश्नांना शास्त्रज्ञांद्वारे व्यक्तीशः उत्तर दिले जाणार आहे. ज्या शेतकर्यांना विद्यापीठात येणे शक्य नाही किंवा संशोधन केंद्रे तसेच तालुक्यातील विस्तार यंत्रणेला भेटणे शक्य नाही त्या शेतकर्यांनी आपल्या पीकासंदर्भातील प्रश्न या ॲपवर टाकल्यानंतर त्यांना शास्त्रज्ञांद्वारे त्यावर उपाय लगेच ऑनलाईन सुचविला जाणार आहे. अशा प्रकारे फुले बळीराजा डिजिटल कृषि सल्ला ॲप्लिकेशन शास्त्रज्ञ व शेतकर्यांमधील दुवा ठरणार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे जर्मन शासन, जी.आय.झेड., नाबार्ड, राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज), हैद्राबाद व मफुकृवि, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने फुले बळीराजा या डिजिटल कृषि सल्ला ऍप्लिकेशनचा एक दिवसीय प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत कर...