Posts

Showing posts from January, 2025

हेलिकॉप्टर खरेदीचा विजयोत्सव !

Image
हेलिकॉप्टरचा विजयस्वोव! स्पाॅट रिपोर्ट @पत्रकार शिवाजी घाडगे  उद्योजक विजय सेठी यांनी स्वतःच्या मालकीचे हेलिकॉप्टर खरेदी केले अण ते घेऊन पहिल्यांदा आपल्या गावी मंगळवारी आले परिसरातील सगळ्यानी त्यांचे मनापासून स्वागत केले.  खरच काही व्यक्ती असतात मुळात ध्येय वेडी असेच राहुरी फॅक्टरी येथील व्यावसायिक पवनकुमार सेठी यांचे कराळे वाडीत पंजाब काॅथ स्टोअर कापड दुकान होते त्यांना दोन मुले व एक मुलगी त्यात विजय हा त्यांचा तसेच अख्या राहुरी फॅक्टरीचा लाडका काॅलेज पासून एक भन्नाट व्यक्तीमत्व नाटकात काम करण्या पासून ते हवाई उडाना पर्यंत हौस असलेले कापड दुकान संजु शेट असायाचे सहाजिकच मग विजय यांनी राहुरीत बादल मुझिक दुकान सुरु केले मग मात्र माघार पाहीलेच नाही राहुरीतुन पुण्याला गेले व तेथे आपला जम बसविला नंतर आपले बंधु संजय व त्यांचा मुलगा बादल याला ही विजु शेट यांनी पुण्यात नेले एक मात्र पहिल्या पासुन त्याना आपल्या परिसरातील तरुणाच्या हाताला काम देण्याची जबरदस्त ईच्छा शक्ती होती ती त्यांनी पुर्ण केली  तस नशरात्र उस्वोव व अण्य स्थानिक मित्र मंडळीच्या सुख दुःख च्या कार्यक्रम...

बिबट्याच्या हल्ल्यात काका येवले बालबाल बचावले

Image
माझीये मरण पाहीले मी माझ्या डोळया  यांचा अनुभव  काका येवले यांना  आला असून राहुरी फॅक्टरी नजीक रहिवाशी  गोवर्धन (काका)भागवत येवले रा. गुजाळ नाका यवले वस्ती यांना आला असून रात्री ते आपले काम उरकून घरा कडे दुचाकीवरून जात असताना दबा धरून बसलेला बिबट्या त्याच्यावर धाऊन आला मात्र काका यवले यांनी समय सुचकता दाखवत दुचाकीचा वेग वाढविल्याने  बिबट्याची शिकार हुकली मात्र काका बालबाल बचावले  काका येवले यांनी घडलेला प्रकार आपले चिरंजीव गणेश याला सांगितले मग गणेश यांनी काका व देवा यांना टॅक्टर वर घेऊन बिबट्या कडे आगेकूच केली व बिबट्याला आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केले खरे मात्र बिबट्याची भिती मात्र कायम होती  येवले वस्तीवर बिबट्या असल्याचे रहिवाशांना सकाळी कळली  चारी व आजुबाजुला शेत असल्याने बिबट्या गारव्याला वास्तव करीत आहे येवले वस्तीवरील बिबट्याचा बंदोबस्त करण्या साठी पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे अनुसुचित जाती जमातीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख भाऊसाहेब पगारे यांनी केली आहे राहुरी वन विभाग कडे केवळ 28 पिंजरे असून त्यातील 10 न...

फुले ऊसाचे वाण सरस कुलगुरु पाटील

Image
उसाचे फुले ऊस 15012, फुले ऊस 13007 व फुले ऊस 15006 हे वाण अधिक सरस -कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील  देशातील उसाच्या क्षेत्रापैकी महाराष्ट्र राज्यात ऊसाचे 18 टक्के क्षेत्र असून 32 टक्के उत्पादन आहे. राज्यामध्ये 86 टक्के क्षेत्र हे पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेल्या वाणांच्याखाली आहे. पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे साखर कारखान्यांची, शेतकर्‍यांची आणि कृषि विद्यापीठाची शान आहे. या संशोधन केंद्रातून ऊसाचे आतापर्यंत 17 वाण आणि 110 शिफारशी प्रसारीत करण्यात आलेल्या आहेत. या ऊसाच्या वाणांमुळेच साखर कारखाने सक्षमपणे सुरू आहेत आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती झाली आहे. हे सर्व श्रेय ऊस वाण निर्मिती करणार्‍या शास्त्रज्ञांना जाते. ज्या राष्ट्रात शास्त्रज्ञांचा सन्मान होतो त्याच राष्ट्राची प्रगती वेगाने होते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.        महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे नव्याने प्रसारीत झालेल्या ऊसाच्या सुधारीत वाणांची ता...

राकेश ओला झाले उपमहानिरीक्षक

Image
नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पदोन्नती  ओला झाले आता उपमहानिरीक्षक  आणि तसेच राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती. संबधीत अधिकाऱ्यांना निवडश्रेणी मिळाली असून सध्या आहे त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे.  आगामी काळात त्यांची (DIG) पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  असे असले तरी  जिल्हा पोलीस पोर्टलवर मात्र राकेश ओला हे अद्याप ही पोलीस अधीक्षक आहेत जर आपल्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां बद्दल येवढी उदासीनता असेल तर सर्व सामान्य जनतेचे काय असा प्रश्न चर्चेला जात आहे

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यास केंद्राचे प्राधान्य- केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

Image
शेतीचे उत्पादन वाढविण्यात  केंद्राचे प्राधान्य - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान  अहिल्यानगर- शेतकरी हा देशाचा श्वास आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स) येथे शेतकरी परिसंवादात चौहान यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत पाटील,  जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे शाखेचे संचालक डॉ .एस.के.रॉय, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील उपस...