Posts

Showing posts with the label एस आय टी कडे तपास वर्ग

भोंदूगिरीवर घाव की श्रध्देचा बाजार

Image
 भोंदूगिरीवर घाव की व्यवस्थेची कसोटी? श्रध्देचा धंदा।शिवाजी घाडगे  नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपविण्यात आल्याने त्याचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. मात्र, या घटनेतून केवळ एका व्यक्तीचे कथित गैरकृत्य नव्हे, तर समाज, प्रशासन आणि अंधश्रद्धा या तिन्हींचा संगम स्पष्टपणे दिसून येतो. अशोक खरात याने अध्यात्म, ज्योतिष आणि मंत्र-तंत्राच्या माध्यमातून समाजात आपली प्रतिमा निर्माण केली. अनेक सुशिक्षित लोकही त्याच्या प्रभावाखाली गेले, हे वास्तव अधिक चिंताजनक आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा किती धूसर झाली आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल. लोकांच्या समस्यांवर त्वरित उपाय देण्याचे आश्वासन देत अशा व्यक्ती समाजात स्थान मिळवतात, हीच आपल्या विचारप्रणालीची कमजोरी आहे. या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीचे काय झाले? ती तक्रार का दाबली गेली? तक्रारदारालाच दोषी ठरवून प्रकरण रफा-दफा करण्यात आले का? जर असे झाले असेल, तर ह...