Posts

Showing posts with the label तनपुरेची निवडणूकीतून माघार

राहुरीत भाजपा व राष्ट्रवादी रंगणार थेट लढत संगतीला अपक्ष

Image
भाजपा व राष्ट्रवादीत रंगणार मुख्य लढत संगतीला अपक्ष  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सुरुवातीला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि भाजपाचे अक्षय कर्डीले यांच्यात थेट लढत होणार, असे चित्र स्पष्ट दिसत होते. मात्र सोमवारी सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष सुनिल चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतलेल्या बैठकीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला. बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करण्यात आली. या घडामोडीनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांच्या या निर्णयावर सध्या विविध स्तरांवर चर्चा सुरू असली, तरी त्याचे विश्लेषण करण्यासाठी अद्याप स्पष्ट राजकीय संकेत समोर आलेले नाहीत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने राहुरी मतदारसंघावरील दावा कायम ठेवत ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर केली. मोकाटे यांची स्थानिक पातळीवर मजबूत ओळख असून ते पूर्वी शिवसेनेत सक्रिय होते. त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे, तर त्यांच्या मुलीने जिल...