Posts

Showing posts from September, 2026

खाकी जरा सबुरीने घ्या !

Image
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे हे तपासी अधिकारी नियुक्त  भिंगार पोलीस उपनिरीक्षक थोरात व काही कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर धाडले 

खाकी जरा सबुरीने घ्या

Image
  खाकी जरा सबुरीने घ्या की! भाष्य।शिवाजी घाडगे  भिंगारमधील गणेश विसर्जन मिरवणुकीतील तरुणाच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित भिंगार उपनगरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दीपक वागस्कर या तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित तरुणाचा मृत्यू पोलिसांच्या कथित लाठीचार्जमुळे झाल्याचा आरोप काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी पोलिसांची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. आरोप कोणाचेही असोत; मात्र एका तरुणाचा जीव गेला आहे, ही बाब सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यामुळे या घटनेकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता, नेमके काय घडले, कोणत्या परिस्थितीत पोलिसांनी हस्तक्षेप केला, लाठीचार्ज झाला का, झाला असल्यास त्याची गरज कितपत होती आणि त्या कारवाईमुळे तरुणाच्या मृत्यूशी काही संबंध आहे का, या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी ह...

भिंगार मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत एकाचा मृत्यू

Image
भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत तणाव तरुणाचा मृत्यू शहर झाले शांत @शहर प्रतिनिधी  अहिल्यानगर शहरातील भिंगार उपनगरात मध्यरात्री गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान झालेल्या कथित  लाठीचार्ज नंतर एका तरुणाचा मृत्यू झाल्याने  तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीपक वागस्कर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून या गंभीर घटनेनंतर  संतापाची लाट उसळीली आहे संबंधित पोलिस अधिकाऱी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना गुलाल उधळण्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान दीपक वागस्कर यांना मारहाण झाल्याचा आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, दीपक वागस्कर यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. उपलब्ध वृत्तांनुसार शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाठीचार्ज आणि मृत्यू यांच्यातील नेमका स...

पार्थर्डीत लाचखोर अंमलदार अडकला

Image
पाथर्डीत पाच लाखांची लाच मागणारा पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात शहर । प्रतिनिधी एका हॉटेलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत प्रकरण सौम्य करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. विनोद शिवाजी मासाळकर (वय ३७, पोलीस अंमलदार, बकल नं. २४६७) असे ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. तडजोडीनंतर ठरलेल्या २ लाख १५ हजार रुपयांपैकी एक लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ सप्टेंबर २०२६ रोजी ३७ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या हॉटेलवर काम करणारा कर्मचारी मोटारसायकलवरून पाथर्डी शहरातून जात असताना एका अनोळखी ट्रकचालकाशी गाडीला कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये मारामारी झाली होती. या प्रकरणात पोलीस अंमलदार विनोद मासाळकर यांनी तक्रारदाराच्या हॉटेलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध ‘हाफ मर्डर’ आणि रॉबरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरो...

गणेशोत्सव कसोटी पोलिसांची

Image
गणेशोत्सवात कसोटी पोलिसांची… भक्ती । शिवाजी घाडगे महाराष्ट्रातील आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाने राज्यभर भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घराघरांत गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनीही आकर्षक सजावट, देखावे आणि विविध सामाजिक उपक्रमांची तयारी केली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला.  शुभ कार्याची सुरुवात गणेशाला वंदन करून केली जाते. गणपती म्हणजे बुद्धीची देवता. ‘सुखकर्ता, दुःखहर्ता’ म्हणून आपण बाप्पाची आराधना करतो. मग प्रश्न एवढाच आहे बुद्धीच्या देवतेचा उत्सव आपण बुद्धीने साजरा करणार आहोत की आवाजाच्या दणदणाटात? गणेशोत्सव आला की सर्वाधिक ताण कोणावर येतो? उत्तर स्पष्ट आहे खाकीवर! सण कोणताही असो, पोलीस मात्र बंदोबस्तावर असतात. गणेशोत्सव, नवरात्र, मोहरम, ईद, दिवाळी, यात्रा, जत्रा, मिरवणुका, आंदोलन, निवडणुका प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाची कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर येते. स्वतःचा सण, कुटुंब, विश्रांती यांचा विचार न करता पोलीस ...

दलित पॅधरच्या झेंड्याखालील तरुण रामदास आठवले

Image
दलित पँथरच्या झेंड्याखालील तरुण रामदास आठवले; संघर्षाच्या त्या दिवसांची आठवण लढवय्या । शिवाजी घाडगे हातात दलित पँथरचा झेंडा... आवळलेली मूठ... चेहऱ्यावर संघर्षाची धार... आणि ओठांवर ‘जय भीम’चा नारा! आज केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले यांच्या तरुणपणीच्या संघर्षाची आठवण करून देणारा हा दुर्मीळ फोटो अनेक जुन्या आठवणींना उजाळा देतो. आजच्या राजकारणातील परिचित चेहऱ्यापेक्षा या छायाचित्रातील रामदास आठवले हे आंदोलनाच्या रस्त्यावर उतरलेले, प्रश्नांसाठी संघर्ष करणारे तरुण कार्यकर्ते म्हणून दिसतात. १९८०च्या दशकातील या छायाचित्रात त्यांचा तत्कालीन लढवय्या अंदाज स्पष्टपणे जाणवतो. कुरळे केस, वाढलेली दाढी, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची आक्रमक देहबोली, हे या छायाचित्राचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या मागे ‘जय भीम, जय भारत’चे फलक आणि दलित पँथरचे कार्यकर्ते दिसत आहेत. एका छायाचित्राच्या माध्यमातून त्या काळातील सामाजिक आंदोलनाचे वातावरण आणि कार्यकर्त्यांची ऊर्जा जणू...

दि राहुरी अर्चन च्या चेअरमन पदी पुन्हा काळे

Image
दि. राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड दि. राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड संस्थेच्या विकासाला नवी दिशा देण्याची जबाबदारी; संचालक मंडळाकडून अभिनंदन राहुरी अल्पावधीतच आपल्या कार्यपद्धतीमुळे नावारूपाला आलेल्या राहुरी फॅक्टरी येथील दि. राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनपदी रामचंद्र विठ्ठल काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या सभागृहात  झालेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. भनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था रावसाहेब खेडकर यांनी काम पाहिले. चेअरमनपदासाठी रामचंद्र काळे यांचे नाव पुढे आल्यानंतर त्यांच्याविरोधात अन्य कोणताही अर्ज अथवा उमेदवारी नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.  दि. राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने अल्पावधीतच सभासदांचा विश्वास संपादन करण्याबरोबरच आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्त, पारदर्शकता आणि सभासदाभिमुख कार्यपद्धतीला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. सहकार क्षेत्रात संस्थेची ...

संवत्सरी:अंतरमनातील अधार दूर करून क्षमा मागण्याचा दिवस

Image
संवत्सरी : अंतर्मनातील अंधार दूर करून क्षमाशीलतेचा दीप प्रज्वलित करण्याचा दिवस! धर्मसंस्कृती । शिवाजी घाडगे माणूस चंद्रावर पोहोचला, विज्ञानाने आकाशाला गवसणी घातली, तंत्रज्ञानाने जग जवळ आणले; परंतु माणसाच्या मनातील दुरावा मात्र अद्याप कमी झालेला नाही. भौतिक सुखसुविधांची रेलचेल वाढली, पण मनःशांतीचा शोध संपलेला नाही. संपत्ती वाढली, प्रतिष्ठा वाढली, अधिकार वाढले; मात्र राग, द्वेष, मत्सर, अहंकार आणि परस्परांतील कटुता यांचे सावटही तितकेच गडद झाले आहे. अशा वेळेस जैन धर्मातील संवत्सरी पर्व मानवजातीला अंतर्मुख करणारा आणि माणुसकीची जाणीव जागविणारा प्रकाशकिरण ठरतो. स्वतःच्या चुकांकडे प्रामाणिकपणे पाहण्याची, इतरांकडून क्षमा मागण्याची आणि मनात साठलेली कटुता दूर करण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. हा केवळ धार्मिक विधींचा भाग नाही, तर मनुष्याच्या अंतःकरणाचे शुद्धीकरण करणारा एक महान संस्कार  म्हणावा लागेल पर्युषण पर्वाचा शेवटचा दिवस म्हणजे संवत्सरी. जैन समाजबांधव या दिवशी वर्षभरातील आपल्या आचार-विचारांचे आत्मपरीक्षण करतात. जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांबद्दल प्रायश्चित्त करतात. ...

महात्मा फुले विद्यापीठांच्या संशोधनाचा डंका

Image
संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संशोधनाचा डंका संशोधन।शिवाजी घाडगे  महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे तीन दिवसीय संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 54 वी बैठक संपन्न झाली. राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दृकश्राव्य माध्यमातून बैठकीला शुभेच्छा दिल्या. या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी फलोत्पादन, रोजगार हमी, खारजमीन विकास मंत्री  भरतशेठ गोगावले, वित्त नियोजन कृषि मदत व पुनर्वसन विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री डॉ. आशिष जयस्वाल, कृषि सचिव परिमल सिंग, कृषि परिषदेचे महासंचालक  राहुल महिवाल, चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरू व आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीच्या समारोप प्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी  कृषि आयुक्त  सुरज मांढरे, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, पंजा...

राहरी तालुका क्रिडा समितीच्या अध्यक्षपदी नितीन घोलप

Image
राहुरी तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी नितीन घोलप नवीन कार्यकारिणी जाहीर राहुरी | प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक व्यापक आणि गतिमान स्वरूप देण्याच्या उद्देशाने राहुरी तालुका क्रीडा समितीची सन २०२६-२७ या वर्षासाठीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील शालेय तसेच विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे, गुणवंत खेळाडूंच्या क्रीडागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि विविध क्रीडा उपक्रमांचे प्रभावी नियोजन करण्याची जबाबदारी नवनियुक्त कार्यकारिणीवर सोपविण्यात आली आहे. समितीच्या क्रीडा अध्यक्षपदी नितीन घोलप यांची निवड करण्यात आली आहे. क्रीडा उपाध्यक्षपदी बाबासाहेब जाधव, संतोष बर्डे, दादासाहेब वाघ, परब सूर्यवंशी आणि धनंजय करपे यांची निवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी गणेश म्हसे, तर उपकार्याध्यक्षपदी गणेश भांड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या कामकाजाची धुरा सचिव अभयसिंह पाटील आणि सहसचिव सुशांत आरंगळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. समितीच्या उपक्रमांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसिद्धी प्रमुख विनायक गोरे आणि सहप्रसिद्धी प्र...

तंत्रज्ञानच्या आरशात आरशात दिसले बालपन

Image
तंत्रज्ञानाच्या आरशात दिसलेले आपलेच बालपण! भाष्य।शिवाजी घाडगे  जशी एखादी चिमणी आपल्या गाडीच्या आरशात बसून आपलेच रूप न्याहाळते, तसेच गेल्या काही दिवसांत अनेकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेल्या आपल्या जुन्या व नव्या छायाचित्रांकडे पुन्हा पुन्हा पाहिले आणि त्या आठवणींमध्ये अक्षरशः रमून गेले. कुणी आपल्या बालपणातील रूप पाहिले, कुणी तरुणपणातील चेहरा पाहिला, तर कुणी आई-वडिलांसोबतचे जुने दिवस नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा डोळ्यांसमोर उभे केले. या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—तंत्रज्ञान कितीही आधुनिक झाले, तरी माणसाच्या आठवणी मात्र कायम जुन्याच असतात. आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपले छायाचित्र जणू काळाच्या पडद्याआड नेऊन पुन्हा आपल्यासमोर आणले आहे. चार-पाच दशकांपूर्वी आपण कसे दिसत होतो, आपले बालपण कसे होते, तरुणपणीचा चेहरा कसा होता, आपल्या आजूबाजूला कोणती माणसे होती, हे पाहण्याची एक वेगळीच संधी या तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली. विशेषतः ज्यांचे वय आता ४६ वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांनी या छायाचित्रांकडे पाहताना केवळ स्वतःचा चेहरा पाहिला नस...

बैल पोळा मात्र शेतकऱ्यांच्या ताटातील भाकरीच काय

Image
बैलांना पुरणपोळी, पण शेतकऱ्यांच्या ताटात भाकरीचा प्रश्न! वास्तव।शिवाजी घाडगे  बैलपोळा आला की  गावाकडची माती जागी होते. बैल सजतात, घराघरांत पुरण शिजते, अंगणात रांगोळ्या उमटतात आणि बळीराजा आपल्या कष्टकरी सवंगड्याची पूजा करतो. परंतु या उत्सवाच्या आनंदामागे आज एक बोचरा प्रश्न उभा आहे बैलांच्या ताटात पुरणपोळी आहे; पण बळीराजाच्या ताटात भाकरी तरी आहे का? महाराष्ट्राच्या शेतीसंस्कृतीत बैलपोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक यंत्रयुगाने शेतीचे स्वरूप बदलले. ट्रॅक्टर आले, आधुनिक अवजारे आली, तंत्रज्ञानाने शेतीत प्रवेश केला; तरी बैलपोळ्याची परंपरा संपली नाही. कारण हा केवळ बैलांचा सण नाही. हा शेतकरी आणि त्याच्या कष्टकरी साथीदारामधील भावबंधाचा उत्सव आहे. वर्षभर शेतकऱ्याबरोबर उन्हातान्हात राबणाऱ्या बैलांना या दिवशी अंघोळ घातली जाते. शिंगांना रंग लावला जातो. बेगड लावले जातात. गळ्यात फुलांचे हार घातले जातात. अंगावर झुल चढवली जाते. घरातील महिला प्रेमाने पुरणपोळी तयार करतात आणि बैलाला नैवेद्य दाखवून त्याला गोड घास भरवतात. ही परंपरा पाहताना मन भरून येते. पण त्याच क्षणी प्रश्नही नि...

महिला मंडल अधिकाऱ्यांवर लाचेचा गुन्हा

Image
सातबारा नोंद संगणकीकृत करण्यासाठी ४ हजारांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱणीवर गुन्हा दाखल  नगर| प्रतिनिधी बुऱ्हानगर येथील प्लॉटची सातबारा उताऱ्यावरील नोंद संगणकीकृत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कापुरवाडी मंडळ अधिकारी संगिता नारायण पुंड (वय ३७) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पुंड यांना मंगळवारी ८ सप्टेंबर   अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय तक्रारदार चालक असून, त्यांनी आपल्या मित्रासोबत दस्त क्र. अ.नं. १/२९१६/२०१३ अन्वये मौजे बुऱ्हानगर येथील गट क्रमांक ६ मधील प्लॉट क्रमांक ४९ मधील ४७५ चौ.मी. क्षेत्रापैकी २१०.९० चौ.मी. क्षेत्र खरेदी केले होते. या खरेदीची नोंद फेरफार क्रमांक ६८०२ अन्वये सातबारा उताऱ्यावर झाली होती. मात्र संगणकीकृत सातबारा तयार करताना ही नोंद कार्यान्वित झाली नव्हती. त्यामुळे संबंधित प्लॉटचा ऑनलाइन सातबारा उतारा मिळण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या मित्राने ८ डिसेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर तहसीलद...

राज बाबा ठाकरे कुटुंबात कन्यारत्न

Image
राज ठाकरे पुन्हा आजोबा; ठाकरे कुटुंबात कन्यारत्नाचे आगमन अमित-मिताली ठाकरे  आई-बाबा; चिमुकल्या लेकीच्या आगमनाने कुटुंबात आनंदोत्सव सुखद।शिवाजी घाडगे   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात आनंदाची बातमी आली असून ठाकरे कुटुंबाच्या अंगणात चिमुकल्या कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाल्याने संपूर्ण ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोड बातमीने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांच्या संसारात चिमुकल्या लेकीच्या रूपाने आणखी एका सुंदर पर्वाची सुरुवात झाली आहे. घरात नव्या पाहुण्याचे आगमन म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो. मात्र मुलीचे आगमन हा आनंद अनेक पटींनी वाढविणारा क्षण मानला जातो. त्यामुळे ठाकरे कुटुंबासाठीही हा क्षण विशेष आणि अविस्मरणीय ठरला आहे. राज ठाकरे पुन्हा आजोबा अमित ठाकरे दुसऱ्यांदा बाबा झाल्याने राज ठाकरे यांची आजोबा म्हणून भ...

गणेशोत्सव आनंदासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा-जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका

Image
गणेशोत्सव आनंदासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा ; जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका  घाडगे न्यूज| प्रतिनिधी गणेशोत्सव हा आनंद, उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा सर्वांनी मनमुराद आनंद घ्यावा; मात्र हा आनंद इतरांना त्रासदायक ठरणार नाही, याचीही काळजी घ्यावी. गणेशोत्सवात डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. तसेच ‘नशामुक्त अहिल्यानगर’ या अभियानाचा प्रचार व प्रसार करून तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राहुरी येथे गणेश मंडळांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, ध्वनिप्रदूषण, विसर्जन मिरवणूक आणि सामाजिक सलोखा यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याव...

अँड सुभाष पाटील साहेब नेतृत्व नव्हे विश्वास!

Image
अँड सुभाष पाटील साहेब म्हणजे नेतृत्व नव्हे; एक विश्वास! जबरविश्वास।शिवाजी घाडगे  पद येतात-जातात, सत्ता बदलते, राजकीय समीकरणे बदलतात; पण माणसांच्या मनात निर्माण झालेला विश्वास कधीच बदलत नाही. आणि म्हणूनच अँड. सुभाष पाटील साहेब हे केवळ एक राजकीय नाव नाही, तर  सार्वजनिक जीवनातील एक विश्वासाची ओळख आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांच्या कर्तृत्वाची वेगळी ओळख आहेच , स्पष्टवक्ते, अभ्यासू, शिस्तप्रिय, दूरदृष्टी असलेले आणि माणसांना जोडणारे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय मा. अँड. सुभाष पाटील साहेब. आज त्यांचा वाढदिवस. या विशेष दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करताना मन अभिमानाने आणि आपुलकीने भरून येते. काही माणसे आयुष्यात येतात आणि केवळ स्वतःची ओळख निर्माण करून थांबत नाहीत; ते आपल्या विचारांनी, कृतीने आणि माणुसकीने अनेकांच्या आयुष्याला दिशा देतात. काही व्यक्ती पदावर असताना मोठ्या वाटतात; पण काही व्यक्ती अशा असतात की पद त्यांच्यामुळे मोठे होते. त्यांच्या नावापुढे पदाची गरज नसते, कारण त्यांच्या कार्यानेच त्यांची ओळख निर्माण झालेली असते. अँड. सुभा...