शासन आपल्या दारी
शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम” जिल्ह्यात 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून मोहीम यशस्वी करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिल्यात. " शासन आपल्या दारी या उपक्रमा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार , सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले की, या उपक्रमाच्या परिणामकारक अंमलबजावणी...