Posts

Showing posts with the label दुर्दैव

दादा गेले पण प्रश्नाचे वादळ थांबेना

Image
 दादा गेले… पण प्रश्नांचे वादळ थांबेना घाडगे न्यूज। शिवाजी घाडगे  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत नेते अजित पवार यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात शोककळा कायमअसताना. मात्र या दुःखद घटनेनंतर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, काही चर्चांमागे त्यांच्या निधनानंतर उसळलेल्या प्रचंड सहानुभूती आणि लोकप्रियतेची धार बोथट करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. दादा आज आपल्यात नाहीत; पण त्यांच्या जाण्यानंतर प्रत्येकजण स्वतःला अधिक शहाणा ठरविण्याच्या स्पर्धेत उतरल्याचे चित्र दिसते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथविधी कधी घ्यायला हवा होता, दहावा-तेरावा झाल्यानंतर घ्यायला हवा होता का, यावरही चर्चा रंगवली जात आहे. दादांच्या जाण्यानंतर घरातील नेतृत्व कोण स्वीकारणार, हा प्रश्नही उपस्थित केला जातो. मात्र अशा चर्चांमधून नेमके काय साध्य होणार, याचाही विचार व्हायला हवा. दादांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एका नेत्याचा अंत झाला नाही, तर एका शैलीचे, एका कार्यपद्धतीचे आणि...